कृषी विभागाचे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 1, 2021 04:13 AM2021-06-01T04:13:28+5:302021-06-01T04:13:28+5:30
एरंडोल : शेतकऱ्यांनी बियाणे खरेदी करताना अधिकृत विक्रेत्याची सही असलेले पक्के बिल घ्यावे व बियाण्याचे पाकीट/पिशवी सिलबंद असल्याची खात्री ...
एरंडोल : शेतकऱ्यांनी बियाणे खरेदी करताना अधिकृत विक्रेत्याची सही असलेले पक्के बिल घ्यावे व बियाण्याचे पाकीट/पिशवी सिलबंद असल्याची खात्री करून घ्यावी, असे आवाहन एरंडोल तालुका कृषी अधिकारी एस. एस. बोरसे यांनी केले आहे.
गुढे ग्रामपंचायतीची
चौकशी सुरू
गुढे, ता. भडगाव : गुढे ग्रामपंचायतीमार्फत झालेल्या विविध कामांत गैरव्यवहार झाल्याच्या तक्रारी गेल्या दोन वर्षांपूर्वी गावातील नागरिकांनी जिल्हा परिषद सीईओंकडे केल्या होत्या. तिथे दाद न मिळाल्याने काही नागरिकांनी औरंगाबाद खंडपीठात याचिका दाखल केली. न्यायालयाच्या आदेशानुसार आता जिल्हा परिषदेने चौकशी सुरू केली आहे.
चाळीसगाव तालुक्यात
नुकसानीचे पंचनामे
चाळीसगाव : तालुक्यात गेल्या आठवड्यात अचानक वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाने जोरदार धुमशान घातले. यात तालुक्यातील आडगाव व देवळी परिसरातील पिकांचे नुकसान झाल्याने महसूल विभागातर्फे पंचनाम्याचे काम सुरू करण्यात आले आहे.