विद्यापीठात नाट्यशास्त्र विभाग सुरू करावे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 13, 2021 04:30 AM2021-03-13T04:30:33+5:302021-03-13T04:30:33+5:30

जळगाव - भावी कलावंत विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव मिळावा, यासाठी कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठात नाट्यशास्त्र विभाग सुरू ...

The Department of Drama should be started in the University | विद्यापीठात नाट्यशास्त्र विभाग सुरू करावे

विद्यापीठात नाट्यशास्त्र विभाग सुरू करावे

Next

जळगाव - भावी कलावंत विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव मिळावा, यासाठी कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठात नाट्यशास्त्र विभाग सुरू करण्यात यावे, अशी मागणी राष्ट्रवारी काँग्रेसचे ॲड. कुणाल पवार व गौरव लवंगले यांनी प्रभारी कुलगुरू यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.

निवेदनात म्हटले की, नाट्यशास्त्र विभाग सुरू व्हावे, यासाठी कलावंतांनी बऱ्याच वेळा तत्कालीन कुलगुरूंची भेट घेऊन पाठपुरावा केला. अर्जसुद्धा करण्यात आले. त्यावर कुलगुरूंनी निधीचे कारण पुढे करून नाट्यशास्त्र विभाग सुरू करण्यात येऊ शकत नाही, असे सांगून त्याबाबत असमर्थता दाखवली होती. परिणामी, कलावंत विद्यार्थी बाहेर जिल्ह्यात शिक्षणासाठी स्थलांतर होतात. त्यामुळे नवीन कलावंत हा जळगावातील विद्यापीठामध्ये तयार व्हावा म्हणून विद्यापीठात नाट्यशास्त्र विभाग सुरू करण्यात यावा, अशी मागणी करण्यात आली आहे.

Web Title: The Department of Drama should be started in the University

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.