पंढरपूर दिंडीचे प्रस्थान
By admin | Published: June 5, 2017 01:30 AM2017-06-05T01:30:40+5:302017-06-05T01:30:40+5:30
खानापूर : डिगंबर महाराज वारीला 35 वर्षाची परंपरा
रावेर : तालुक्यातील चिनावल येथील वैकुंठवासी वारकरी गुरुवर्य हभप डिगंबर महाराज पायी दिंडी सोहळा हरिनामाच्या गजरात रविवारी खानापूर येथून पंढरपूरकडे रवाना झाला़
भगव्या ध्वजपताका खांद्यावर घेत टाळ मृदंगाच्या गजरात वारक:यांची पावले पंढरपूरकडे निघाली़ अनेक आबालवृद्धांचा वारीत समावेश आह़े
तब्बल 35 वर्षाची प्रदीर्घ परंपरा लाभलेल्या या पायी वारी दिंडीचे शनिवारी रात्री दिंडीमालक हभप अरुण महाराज बोरखेडेकर यांच्या श्रीराम मंदिरात प्रास्तविक कीर्तन झाले. रविवारी ज्येष्ठ शु.।। दशमीचे औचित्य साधून पहाटे येथील भजनी मंडळींसह वारक:यांनी टाळ मृदंगाच्या गजरात नगरप्रदक्षिणा घातली.
चंद्रकलाबाई गोटीवाले गोशाळा, कजरेद, वाघोड, ओंकारेश्वर मंदिर, रावेर, विवरे येथे ठिकठिकाणी चहापान व फराळाची दात्यांनी व्यवस्था करून स्वागत केल़े
खानापूरहून ज्येष्ठ शुध्द दशमीला या पायी दिंडी वारीचे प्रस्थान झाल्यानंतर पहिला मुक्काम चिनावल येथे श्री दिगंबर महाराजांच्या पुण्यभुमीत घेत ज्येष्ठ शु एकादशीला प्रस्थान होणार आह़े
हंबर्डी, खडका, जामनेर, भारुडखेडा, गोळेगाव, सिल्लोड, भोकरदन, केदारखेडा, पांगरी, जालना, अंबड, शहागड, पाडळसिंगी, बीड, उदंडवडगाव, पारगाव, भूम, कोरेगाव, बार्शी, वडशिंगे, उपळाई व आष्टीचा शेवटचा मुक्काम घेऊन 24 मुक्कामानंतर आषाढ शु.।। चतुर्थीला हा पायी दिंडी सोहळा चंद्रभागेच्या तिरी नव्या सोलापूर रोडवरील श्री दिगंबर महाराज वारकरी संस्थानतर्फे उभारण्यात आलेल्या भव्य वारकरी निवासात विसावणार आह़े