ठेवीदारांच्या आशेवर ‘अपेक्षा’ने फिरवले पाणी
By admin | Published: May 5, 2017 12:37 AM2017-05-05T00:37:16+5:302017-05-05T00:37:16+5:30
बोदवड : 70 वर्षीय वृद्धेने फोडले बिंग
बोदवड : 72 लाखांच्या अपहाराचा ठपका बसलेल्या जिल्हा बँकेच्या येथील शाखेतील महिला लिपिक कर्मचारी अपेक्षा विवेक पांडे यांना भुसावळ न्यायालयाने दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.
2016 मध्ये जिल्हा बँकेत बाजार समितीच्या कर्मचा:याने पेन्शन सेवानिवृत्तीचे वेतन खात्यातून परस्पर काढल्यानंतर व येथील नवसाबाई यादव माळी या 70 वर्षीय महिलेने परिचित शोभा उर्फ अपेक्षा विवेक पांडे या बँक कर्मचारी असताना खात्यातून पैसे काढण्यासाठी गर्दी असल्याने पासबुक ठेवले व अंगठा देऊन पैसे काढण्याच्या भरवशावर राहिले असता वारंवार मागणी करूनही अपेक्षा पांडे पासबुक देत नव्हत्या. रक्कमही देत नव्हत्या. घर बांधकामासाठी ठेवलेले पैसे वारंवार मागून देत नसल्याने बँकेत तक्रार केली आणि यातूनच अपेक्षाच्या अपहारकांडाचा भंडाफोड झाला होता.
बँक अध्यक्षा रोहिणी खडसे यांच्यार्पयत तक्रार गेली. त्यांनी चौकशी लावली होती. ‘लोकमत’ने चौकशीचे वृत्त प्रसिद्ध केले. त्यामुळे ठेवीदारांनी ठेवी काढण्यासाठी बँकेत रांगा लावल्या होत्या. त्यात अनेकांच्या ठेवी, श्रावण बाळ योजना, संजय निराधार योजनेतून रक्कम काढल्याचे उघड झाले. त्यात बँकेने 72 लाखांचा अपहार नमूद केला खरा. परंतु या अपहाराचा आकडा कोटी रुपयांवर असून, अनेकांच्या ठेवींच्या रकमेवर ‘अपेक्षे’ने हात फिरवला असल्याची चर्चा आहे. अपेक्षा पांडेच्या अटकेचे वृत्त प्रसिद्ध झाल्यानंतर ज्या ठेवीदारांच्या ठेवीवर अपेक्षा पांडे यांनी हात फिरवला त्यांच्या प्रतिक्रिया घेतल्या असता काहींचे मुलीचे लग्न, काहींचे सेवानिवृत्तीचे तर काहींनी भविष्याची तरतूद म्हणून ठेवलेल्या ठेवी गेल्याचे लाखोली वाहिली.
सुमनबाई मुरलीधर कदेंकर यांची 70 हजारांची रक्कम मुलगा शिकत असताना सीएच्या उच्च शिक्षणासाठी कडय़ा, पाटल्या मोडून ठेवल्या होत्या.
70 वर्षीय नवसाबाई यादव माळी यांनी घर बांधकामासाठी शेती विकून चार लाख रुपये बँकेत ठेवले होते.
विजय लक्ष्मण माळी यांनी मुलगी पुनमच्या लगAासाठी लाख रुपये ठेवले होते.
कमलाबाई अजरुन चोपडे यांनी भरण्यासाठी बँकेत रक्कम ठेवली.
ठेवीदाराला हृदयविकाराचा झटका
विजय धोबी यांनी पोटाला चिमटा मारत दीड लाखाच्यावर रक्कम ठेव ठेवली. ही घटना उघडकीस आल्यानंतर त्याला हृदयविकाराचा झटका आला. काही सेवानिवृत्त कर्मचा:यांचे वेतनही पांडे बाईंनी रिचवले.
एकटय़ा महिला कर्मचा:याकडून शक्य नसून यात काही सहका:यांचा हात असल्याची शक्यता नाकारता येत नसून, मोठे घबाड उघडकीस येण्याची शक्यता आहे.
(वार्ताहर)