शेंदुर्णीत शिवसेना व मनसेच्या उमेदवारांची अनामत जप्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 11, 2018 03:50 PM2018-12-11T15:50:05+5:302018-12-11T15:52:36+5:30
शेंदुर्णी नगरपंचायतच्या नगराध्यक्षपदाची निवडणुक लढविलेल्या शिवसेना व मनसे उमेदवारांची अनामत जप्त झाल्याची माहिती सहाय्यक निवडणुक अधिकारी राहुल पाटील यांनी दिली.
जामनेर : शेंदुर्णी नगरपंचायतच्या नगराध्यक्षपदाची निवडणुक लढविलेल्या शिवसेना व मनसे उमेदवारांची अनामत जप्त झाल्याची माहिती सहाय्यक निवडणुक अधिकारी राहुल पाटील यांनी दिली. यासह नगरसेवकपदासाठी निवडणूक लढविणाºया शिवसेना व मनसेच्या बहुतांश उमेदवारांची अनामत जप्त झाली.
नगराध्यक्ष पदाची निवडणुक लढविलेल्या शिवसेनेच्या उमेदवार मनीषा बारी, मनसेच्या सरीता चौधरी यांची अनामत जप्त झाली. नगरसेवकपदाची निवडणुक लढविलेले व अनामत रक्कम जप्त झालेले उमेदवार असे- प्रभाग १ भक्ती कुलकर्णी (मनसे), प्रभाग ४ सरीता चौधरी (मनसे), मीराबाई मांग (शिवसेना), प्रभाग ५ अजगर अकबर (मनसे), प्रभाग ७ भक्ती कुलकर्णी (मनसे), प्रभाग ९ उषा बारी (मनसे), मनीषा बारी (शिवसेना), प्रभाग १० ज्ञानेश्वर पाटील (शिवसेना) , प्रभाग ११ संजय सुर्यवंशी (शिवसेना), प्रभाग १२ विजयानंद कुलकर्णी (मनसे), प्रभाग १३ विजयानंद कुलकर्णी (मनसे), शेख रियाज फयाज (अपक्ष), प्रभाग १४ उषा बारी (मनसे), प्रभाग १६ अशोक बारी (शिवसेना) व पुनम बारी (अपक्ष), प्रभाग १७ सिंधुताई माळी (शिवसेना). अनामत जप्त झालेल्या उमेदवारांमध्ये सर्वाधिक शिवसेना व मनसेचे उमेदवार होते.