वंचित बहुजन आघाडीतर्फे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 17, 2020 08:15 PM2020-12-17T20:15:06+5:302020-12-17T20:15:23+5:30
जळगाव : केंद्र शासनाने संसदेत बहुमताच्या बळावर कामगार व शेतकरी हितविरोधी काळे कायदे पारित केले आहेत. हे कायदे रद्द ...
जळगाव : केंद्र शासनाने संसदेत बहुमताच्या बळावर कामगार व शेतकरी हितविरोधी काळे कायदे पारित केले आहेत. हे कायदे रद्द करण्याच्या मागणीसाठी दिल्लीत पंधरा ते वीस दिवसांपासून शेतकरऱ्यांचे आंदोलन सुरू आहे. या शेतकरी आंदोलनाला वंचित बहुजन आघाडीने पाठिंबा देत जिल्हाधिकारी कार्यालयासमोर गुरुवारी धरणे आंदोलन करण्यात आले.
भाजपकृत केंद्र सरकारने संसदेत शेती संबंधित तीन विधेयके पारित करण्यात आली आहेत. केंद्र शासनाने या संदर्भात विधेयके पारित करताना कोणतीही चर्चा न करताच मंजूर केले आहेत. या विधेयकांमुळे शेतकरी कामगार कष्टकऱ्यांवर अन्याय होणार असून, याचा निषेध म्हणून दिल्ली येथे शेतकऱ्यांचे आंदोलन सुरू आहे. या आंदोलनाला पाठिंबा देत ही तिन्ही शेतकरीविरोधी विधेयक रद्द करण्यात यावीत या मागणीसाठी धरणे आंदोलन करण्यात आले. यावेळी जिल्हाध्यक्ष विनोद सोनवणे, शमिभा पाटील, प्रमोद पाटील, दिनेश इखारे, देवदत्त मकासरे, डिगंबर सोनवणे, विद्यासागर खरात, प्रकाश सोनवणे, जितेद्र केदार, गिरिश नेहते, सचिन वानखेडे, राहुल सपकाळे, वंदना सोनवणे, फिरोज शेख, भीमराव सोनवणे, संगीता मोरे, पंचशीला आराक, ॲड. विनोद इंगळे, संगीता भामरे, वनिता इंगळे, जयश्री ननवरे, नाजीमाबी आदी पदाधिकारी उपस्थित होते.