जामनेर उपजिल्हा रुग्णालयातील आरोग्य सेवक सुविधांपासून वंचित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 30, 2020 02:29 PM2020-03-30T14:29:41+5:302020-03-30T14:30:40+5:30

उपजिल्हा रुग्णालयात कोरोनाच्या पार्श्वभूमीवर काम करणाºया डॉक्टर व आरोग्य कर्मचाऱ्यांन मास्क व इतर आवश्यक सुविधांची कमतरता जाणवत आहे.

Deprived of health care facilities at Jamner Upazila Hospital | जामनेर उपजिल्हा रुग्णालयातील आरोग्य सेवक सुविधांपासून वंचित

जामनेर उपजिल्हा रुग्णालयातील आरोग्य सेवक सुविधांपासून वंचित

Next
ठळक मुद्दे‘कोरोनाशी लढा’ म्हणणाऱ्या प्रशासनाने याकडे लक्ष देण्याची गरजमागणी करुनही पुरवठा होत नसल्याने वापरलेली जुनी साधने पुन्हा पुन्हा वापरण्याची वेळ

जामनेर, जि.जळगाव : उपजिल्हा रुग्णालयात कोरोनाच्या पार्श्वभूमीवर काम करणाºया डॉक्टर व आरोग्य कर्मचाऱ्यांन मास्क व इतर आवश्यक सुविधांची कमतरता जाणवत आहे. वारंवार मागणी करुनदेखील पुरवठा होत नसल्याने वापरलेली जुनी साधने पुन्हा पुन्हा वापरण्याची वेळ या आरोग्य सेवकांवर आली आहे. ‘कोरोनाशी लढा’ म्हणणाºया प्रशासनाने याकडे लक्ष देण्याची गरज आहे.
उपजिल्हा रुग्णालयात स्वतंत्र १० खाटांचे विलगीकरण कक्ष व आयसीयू निर्माण केले आहे. तपासणीसाठी येणाºयांना याचा लाभ होत आहे.
आरोग्य सेवा देताना रुग्णालयातील डॉक्टर्स व कर्मचाºयांंना मास्क, हातमोजे, टोपी, गावून, सॅनिटाईझर, हँडवॉश व चष्मे यांची आवश्यकता भासते. मात्र मागणी करुनदेखील पुरवठा होत नाही. जिल्हा शल्यचिकित्सकांनी याकडे लक्ष देऊन पुरवठा करावा, अशी मागणी होत आहे.

Web Title: Deprived of health care facilities at Jamner Upazila Hospital

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.