एसीईओंचा प्रभारी पदभार डेप्युटी सीईओ रणदिवेंकडे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 2, 2021 04:14 AM2021-06-02T04:14:46+5:302021-06-02T04:14:46+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी गणेश चौधरी हे ३१ मे रोजी सेवानिवृत्त झाल्यानंतर ...
लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी गणेश चौधरी हे ३१ मे रोजी सेवानिवृत्त झाल्यानंतर या पदाचा प्रभारी पदभार हा सामान्य प्रशासन विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी कमलाकर रणदिवे यांच्याकडे सोपविण्यात आला आहे, तर दुसरीकडे ग्रामीण विकास यंत्रणेचे प्रकल्प संचालक पदही रिक्त असून या ठिकाणी पाणी व स्वच्छता विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी डी. आर. लोखंडे यांच्याकडे पदभार सोपविण्यात आला आहे.
गेल्या कित्येक वर्षांपासून जिल्हा परिषदेतील काही महत्त्वाची पदे रिक्तच राहत असून एका अधिकाऱ्याकडे याचा अतिरिक्त पदभार सोपविला जात आहे. वर्षानुवर्षे असेच चित्र असून जळगावात अधिकारीच येत नसल्याने ही पदे रिक्त राहत असल्याचेही आता बोलले जात आहे. संजय मस्कर हे सेवानिृत्त झाल्यानंतर अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी हे पद दीड वर्ष रिक्त होते. त्यानंतर गणेश चौधरी यांची पूर्णवेळ या ठिकाणी नियुक्ती झाली होती. मात्र, सात महिन्यांच्या कालावधीने ते सेवानिवृत्त झाल्याने हे पद पुन्हा रिक्त झाले आहे.
ही प्रमुख पदे रिक्त...
जिल्हा ग्रमाीण विकास यंत्रणेचे प्रमुख प्रकल्प संचालक हे पद गेल्या दोन वर्षांपासून रिक्तच आहे. प्रभारी पदभार म्हणून विविध अधिकाऱ्यांकडे तो सोपविण्यात आला होता. यासह समाजकल्याण अधिकारी या पदावरही वर्षानुवर्षे प्रभारी अधिकारी आहे. यासह शिक्षणाधिकारी या पदाचा पदभारही एरंडोल गटविकास अधिकारी भाऊसाहेब अकलाडे यांच्याकडे प्रभारी आहे. लघुसिंचन कार्यकारी अभियंता, पाणीपुरवठा कार्यकारी अभयंता ही प्रमुख पदेही रिक्त असून अन्य अधिकाऱ्यांकडे ही अतिरिक्त जबाबदारी सोपविण्यात आली आहे.
महत्त्वाची पदे वर्षानुवर्षे रिक्त राहत असल्याने महत्त्त्वाच्या योेजना, कामे रखडत असल्याचे चित्र आहे.