चाळीसगाव कॉलेजच्या सात दिवसीय रासेयोचे शिबिराची सांगता
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 15, 2020 07:06 PM2020-01-15T19:06:28+5:302020-01-15T19:07:19+5:30
बी.पी.आर्ट्स एस.एम.ए. सायन्स अॅण्ड के.के.सी. कॉमर्स कॉलेज व के.आर.कोतकर कनिष्ठ महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजनेच्या विशेष श्रमसंस्कार शिबिराचे उद्घाटन वाघळी, ता.चाळीसगाव येथे नुकतेच झाले.
चाळीसगाव, जि.जळगाव : बी.पी.आर्ट्स एस.एम.ए. सायन्स अॅण्ड के.के.सी. कॉमर्स कॉलेज व के.आर.कोतकर कनिष्ठ महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजनेच्या विशेष श्रमसंस्कार शिबिराचे उद्घाटन वाघळी, ता.चाळीसगाव येथे नुकतेच झाले.
समरिनबी कुदरत अली शहा व हर्षदा विलास धनगर या जि.प.शाळेच्या विद्यार्थ्यांनी उद्घाटन केले. अध्यक्षस्थानी चाळीसगाव एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष बाळासाहेब चव्हाण होते. प्रमुख अतिथी म्हणून राष्ट्रीय शिक्षण संस्थेचे सचिव अरुण निकम, चेअरमन डॉ.एम.बी.पाटील, एन.वाय.एन.सी. कॉलेजचे प्राचार्य डॉ.एस.आर.जाधव, उपप्राचार्य डॉ.पी.एस.बाविस्कर, मुख्याध्यापक ईश्र्वरलाल अहिरे, वाघळीचे सरपंच विकास चौधरी, कुद्रत अली शाह, गिरीश बºहाटे व नागरिक उपस्थित होते.
सात दिवसीय शिबिरात रासेयो स्वयंसेवकांनी जि. प. मुलांची शाळा, कन्याशाळा, प्राथमिक आरोग्य केंद्रात स्वच्छता केली. त्याचप्रमाणे स्मशानभूमीत स्वच्छतेसह अंधश्रद्धा निर्मूलनसाठी प्रयत्न केले. बौद्धिक सत्रात प्रा.धनंजय वसईकर, मुकेश पाटील, डॉ.वि.रा.राठोड, डॉ.किरण गंगापूरकर, डॉ.विजय मांटे, प्रा.विजय शिरसाठ, सागर नागणे, प्रा.नीलेश गुरुचळ, डॉ.गिरीश कोळी, प्रशांत लेले, हेमंत साळी, प्रा.प्रभाकर पगार, रमेश जानराव, रनजीत गव्हाळे, प्रा.जे.बी.पाटील, दीपक शुक्ल यांनी विविध विषयांवर प्रबोधनात्मक व्याख्याने दिली.
स्वयंसेवकांनी प्रबोधनात्मक रॅली काढून विविध विषयांवर पथनाट्य सादर केली. त्यादरम्यान गावातील ज्येष्ठ नागरिकांनी स्वयंसेवकांचा सन्मान चिन्ह देऊन गौरव केला. शिबिर समारोपास मॅनेजिंग बोर्ड चेअरमन नारायनदास अग्रवाल अध्यक्षस्थानी होते. याप्रसंगी खासदार उन्मेष पाटील यांनी मार्गदर्शन केले. मनीषा काळे, धवल सूर्यवंशी, समीर शिंपी, रुपेश चंदेले या स्वयंसेवकाने मनोगत व्यक्त केले.
उत्कृष्ट कामगिरी करणाºया अमोल घोडेस्वार, प्रियंका महाजन, आकाश राठोड, प्रियंका महाले, धवल सूर्यवंशी, रुपेश चांदीले, कविता सोनकांबळे, विकास पाटील, अंकिता गुंजाळ, अविष्कार जाधव, माधव पाटील, साहिल मिर्झा, पूजा पवार, अनुराग अगोने, तेजस्विनी महाले, दुर्गेश भामरे, जागृती निकम, कृष्णा निंबाळकर, सुनंदा पाटील यांना गौरवण्यात आले. जि.प.चे माजी सभापती पोपट एकनाथ भोळे, संस्थेचे उपाध्यक्ष मिलिंद देशमुख व संचालक क.मा.राजपूत यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. प्राचार्य डॉ.एम.व्ही. बिल्दीकर यांनीही मार्गदशन केले.
याप्रसंगी व्यासपीठावर उपप्राचार्य प्रा.अजय काटे, नरेंद्र जैन, अविनाश सूर्यवंशी, गिरीश बºहाटे, अर्जुन परदेशी, धनंजय सूर्यवंशी, बिºहाडे, अर्जुन परदेशी उपस्थित होते. प्रास्ताविक प्रा.नितीन नन्नावरे यांनी केले. सूत्रसंचालन प्रा.आर.एस. पाटील यांनी, तर आभार प्रा.गौतम सदावर्ते यांनी मानले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी प्रा.रवींद्र बोरसे, प्रा.वैशाली पाटील, प्रा.सुनीता कावळे, प्रा.सुरेखा मराठे, प्रा.शुभांगी जगताप, प्रा.शुभांगी घोरपडे, हेमंत मालपुरे, शुभम पाटील, स्वयंसेवक आविष्कार जाधव, दीपक चव्हाण, कपील करपे, प्रतीक पाटील, मयूर पाटील, हेमांगी पाटील, हर्षदा पाटील, दीपाली पाटील, माधव पाटील, ऋतुजा निकम तसेच रासेयो स्वयंसेवकांनी परिश्रम घेतले.