देशकरी' ठरली तिसऱ्या देवगिरी शॉर्ट फिल्म ची उत्कृष्ट फिल्म;"पिलग्रीम ऑफ हतनूर' उत्कृष्ट माहिती पट

By ऑनलाइन लोकमत | Published: January 28, 2024 11:15 PM2024-01-28T23:15:19+5:302024-01-28T23:15:28+5:30

कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ आणि विवेकानंद प्रतिष्ठान संस्थेचे खाशाबा वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय जळगाव यांच्या संयुक्त विद्यमाने तिसरा देवगिरी शॉर्ट फिल्म फेस्टिवल पुरस्कार सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला.

Deshkari' was the best film of the third Devagiri short film; "Pilgrim of Hatnoor" was the best infomercial | देशकरी' ठरली तिसऱ्या देवगिरी शॉर्ट फिल्म ची उत्कृष्ट फिल्म;"पिलग्रीम ऑफ हतनूर' उत्कृष्ट माहिती पट

देशकरी' ठरली तिसऱ्या देवगिरी शॉर्ट फिल्म ची उत्कृष्ट फिल्म;"पिलग्रीम ऑफ हतनूर' उत्कृष्ट माहिती पट

भूषण श्रीखंडे

जळगाव : कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ आणि विवेकानंद प्रतिष्ठान संस्थेचे खाशाबा वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय जळगाव यांच्या संयुक्त विद्यमाने तिसरा देवगिरी शॉर्ट फिल्म फेस्टिवल पुरस्कार सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला. या तिसऱ्या देवगिरी शॉर्ट फिल्म फेस्टिवल मध्ये संजय दैव दिग्दर्शक यांची देशकरी' ही उत्कृष्ट फिल्म ठरली. तर अरविंद जोशी यांची "पिलग्रीम ऑफ हतनूर' उत्कृष्ट माहिती पट ठरला. व तर "द डील" ने उत्कृष्ठ कॅम्पस फिल्म ठरली. या फेस्टिवलसाठी 109 शॉर्टफिल्म आल्या त्यातील विशेष 62 शॉर्टफिल्म दाखवण्यात आलेत.

देवगिरी शॉर्ट फिल्म फेस्टिवल गेल्या दोन दिवसापासून छत्रपती संभाजीराजे नाट्यगृह येथे मोठ्या उत्साहात पार पडला. जैन उद्योग समूहाचे अध्यक्ष अशोक जैन यांच्या हस्ते पुरस्कार देण्यात आला. यावेळी प्रसिद्ध दिग्दर्शक विजय लोटन पाटील,नितीन भास्कर,संगीतकार रोहित नागभीडे,  कबचौ उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाचे रजिष्ठार डॉ विनोद पाटील,कबचौ उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाचे सिनेट सदस्य राजेंद्र नन्नवरे उदयोगपती प्रकाश चौबे,प्रांत सह कार्यवाह स्वानंद झारे, ऍड. सुशील अत्रे, देवगिरी फिल्म चे प्रांत संयोजक किरण सोहळे, कबचौ उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाचे विद्यार्थी विकास संचालक डॉ. प्रा. जयंद्र लेकुरवाळे, विवेकानंद प्रतिष्ठान चे अध्यक्ष श्रीमती शोभा पाटील उपस्थित होते. तर यशस्वीतेसाठी सचिव डॉ. रत्नाकर गोरे,हेमलता अमळकर, चित्र साधना प्रांत संयोजक किरण सोहळे,विनीत जोशी,संजय हांडे, सुचित्रा लोंढे,संतोष सोनवणे, प्रा सचिन कुंभार गौरव नाथ, पार्थ ठाकर, विवेकानंद प्रतिष्ठान विद्यालयातील शिक्षक तसंच कर्मचाऱ्यांचे सहकार्य लाभले.

Web Title: Deshkari' was the best film of the third Devagiri short film; "Pilgrim of Hatnoor" was the best infomercial

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.