प्रवाशांचा ‘मनस्ताप’ कधी दूर होणार...
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 2, 2019 11:37 PM2019-02-02T23:37:34+5:302019-02-02T23:39:32+5:30
रेल्वे प्रशासनाने प्रवाशांच्या सोयीसाठी लोकप्रतिनिधींच्या मागणीनंतर अनेक लांब पल्ल्याच्या गाड्यांना जळगाव, पाचोरा व चाळीसगाव स्थानकावर थांबा दिला आहे. यामुळे प्रवाशी संघटनांतर्फे रेल्वे प्रशासनाचे स्वागतही करण्यात येत आहे. मात्र,या गाड्या बहुतांश वेळा या गाड्या १ ते २ तासांनी विलंबाने धावत असल्यामुळे, प्रवाशांना चांगलाच मनस्ताप सहन करावा लागत आहे.
सचिन देव
जळगाव : रेल्वे प्रशासनाने प्रवाशांच्या सोयीसाठी लोकप्रतिनिधींच्या मागणीनंतर अनेक लांब पल्ल्याच्या गाड्यांना जळगाव, पाचोरा व चाळीसगाव स्थानकावर थांबा दिला आहे. यामुळे प्रवाशी संघटनांतर्फे रेल्वे प्रशासनाचे स्वागतही करण्यात येत आहे. मात्र,या गाड्या बहुतांश वेळा या गाड्या १ ते २ तासांनी विलंबाने धावत असल्यामुळे, प्रवाशांना चांगलाच मनस्ताप सहन करावा लागत आहे.
दररोज कामानिमित्त, व्यवासायिनिमत्त हजारो चाकरमानी चाळीसगाव व पाचोरा तालुक्यातुन जळगावला येत असतात. या स्थानकांवर लांब पल्ल्याच्या सुपरफास्ट गाड्यांना थांबा नसल्यामुळे, येतांना महाराष्ट्र एक्सप्रेस किंवा नाशिक-भुसावळ पॅसेंजरनेच यावे लागत होते. तसेच जातांनादेखील सायंकाळी याच गाड्यांनी घराकडे जावे लागायचे. त्यामुळे सचखंड एक्सप्रेस, महानगरी एक्सप्रेस या गाड्यांना चाळीसगाव व पाचोरा स्थानकावर थांबा मिळण्याची अनेक वर्षांपासून प्रवाशांची मागणी सुुरु होती.अखेर गेल्या आठवड्यांत खासदार ए. टी. पाटील यांनी रेल्वे मंत्रालयाकडे पाठपुरावा करुन, प्रवाशांना दिलासा दिला आहे. या गाड्यांना चाळीसगाव व पाचोºयाला थांबत असल्यामुळे प्रवाशाांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.
मात्र, या गाड्या वेळेवर न धावता उशिरा धावत असल्याने, प्रवाशांना या गाड्यांचा कुठलाही फायदा झालेला नाही. त्यामुळे या गाड्यांना थांबा देऊन, उपयोग काय असा प्रश्न प्रवाशांतर्फे उपस्थित करण्यात येत आहे. तसेच अधून-मधून अपची महाराष्ट्र एक्सप्रेस भुसावळ- नाशिक पॅसेंजरही विलंबाने धावत असल्याने, प्रवाशांचे चांगलेच हाल होत आहे. रेल्वे प्रशासनातर्फे उत्तर प्रदेशात थंडीमुळे तर कधी तांत्रीक कामामुळे गाड्या विलंबाने धावत असल्याचे उत्तर देण्यात येत आहे. मात्र, हा प्रकार हिवाळ््यापुरताच नसुन उन्हाळ््यातदेखील या गाड्या विलंबाने धावत असल्याचे प्रवाशांचे म्हणणे आहे. भुसावळ ते मनमाड दरम्यान हजारो नोकरदार वर्ग अपडाऊन करत असुन, विलंबाने धावत असलेल्या गाड्यांमुळे प्रवाशांना घरी जाण्यासाठी २ ते ३ तासांचा कालावधी लागत आहे. यामुळे महिला वर्गांचे मोठ्या प्रमाणावर हाल होत आहेत.
तर स्वतंत्र गाडी सुरु करण्याची मागणी
मनमाड ते भुसावळ दरम्यान हजारो चाकरमानी अफडाऊन करत असून, बहुतांश वेळा गाडी विलंबाने धावत असल्याने चाकरमान्यांचे चांगलेच हाल होत आहेत. चाकर मान्यांमुळे रेल्वे प्रशासनालाही चांगले उत्पन्न मिळत असल्याने, रेल्वेने चाकर मान्यासांठी भुसावळ ते जळगाव दरम्यान स्वतंत्र गाडी सुरु करण्याची मागणी प्रवाशांतर्फे करण्यात येत आहे.