जळगाव येथे रामानंद नगरातून बंदी असतानाही वाळू वाहतूक करणारे चार वाहने पकडले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 22, 2018 10:56 PM2018-03-22T22:56:53+5:302018-03-22T22:56:53+5:30
रामानंद नगर परिसरात वाळू वाहतूक करणाºया डंपरने दुचाकीस्वाराला उडविल्यानंतर जागे झालेल्या पोलीस यंत्रणेने गुरुवारी सकाळपासून रामानंद नगर परिसरात बंदोबस्त तैनात केला. या भागातून वाळू वाहतूक करणारे एक डंपर व तीन ट्रॅक्टर पोलिसांनी जप्त केले आहे. त्या वाहनचालक व मालकांनी न्यायालयात पाठविण्यात आले.
आॅनलाईन लोकमत
जळगाव दि, २२: रामानंद नगर परिसरात वाळू वाहतूक करणा-या डंपरने दुचाकीस्वाराला उडविल्यानंतर जागे झालेल्या पोलीस यंत्रणेने गुरुवारी सकाळपासून रामानंद नगर परिसरात बंदोबस्त तैनात केला. या भागातून वाळू वाहतूक करणारे एक डंपर व तीन ट्रॅक्टर पोलिसांनी जप्त केले आहे. त्या वाहनचालक व मालकांनी न्यायालयात पाठविण्यात आले.
रामानंद नगरातील म्युनिसिपल कॉलनीजवळ बुधवारी दुपारी बरकत मुस्ताक पाशा (वय,३० रा.गणेशपुरी मेहरुण, जळगाव) या तरुणाला भरधाव वेगाने जाणा-या डंपरने (क्र.एम.एच.१९ झेड ६५६५) उडविले होते. या अपघाताच्या पार्श्वभूमीवर रामानंद नगर पोलीस स्टेशनचे निरीक्षक बी.जी.रोहोम यांनी गुन्हे शोध पथकाचे सहायक फौजदार गोपाळ चौधरी, प्रदीप चौधरी व शरद पाटील यांच्या पथकाला वाळू वाहतूक करणा-या वाहनांवर कारवाई करण्याचे आदेश दिले होते. रामानंद नगर परिसरात अवजड वाहनांना बंदी आहे.
यांच्यावर झाली कारवाई
बद्रीलाल बढीलाल पावरा (वय २४, रा.सेंधवा, ता.नेवाळी, मध्य प्रदेश) ट्रॅक्टर क्र.एम.एच.१९-८९३०, राजेंद्र चंद्रभान इंगळे (वय २८ रा.दिनकर नगर, जळगाव) ट्रॅक्टर क्र.एम.एच.१९ ए.पी.५०६९ व ट्राली क्र.एम.एच.१९ बी.डी.२४४७, गणेश धर्मा पाटील (वय ३२,रा.रिधूर, ता.जळगाव) ट्रॅक्टर क्र.एम.एच.१९ ए.पी.५१८४ व ट्राली क्र.एम.एच.१९ ए.एन.७०२९ व निलेश राजेंद्र भालेराव (वय २१ रा.खेडी,ता.जळगाव) डंपर क्र.एम.एच.१९-४४१४ यांच्यावर अवजड वाहतुकीची कारवाई करण्यात आली. या वाहन चालक व मालकांना न्यायालयात पाठविण्यात आले.
डंपर चालकावर गुन्हा दाखल
बुधवारी झालेल्या अपघात प्रकरणात डंपर क्र.एम.एच.१९ झेड ६५६५ यावरील चालकाविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला. पोलीस कर्मचारी मनोज इंद्रेकर यांनी फिर्याद दिली. डंपर चालकाला पकडल्यानंतरही फिर्यादीत अज्ञात चालक दाखविण्यात आला आहे. गुरुवारीही डंपर मालक निष्पन्न झालेला नव्हता.