स्वत: अल्पशिक्षित असूनही पाचही मुलांना केले उच्च शिक्षित
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 8, 2019 12:45 AM2019-03-08T00:45:51+5:302019-03-08T00:46:22+5:30
पाचही मुलांना उच्च पदावर पोहोचवले
प्रमोद ललवाणी
कजगाव, ता.भडगाव : येथून जवळच असलेल्या बांबरुड (पाटस्थळ, ता.भडगाव) येथील रहिवासी जिजाबाई संतोष सिंग परदेशी (वय ७८) या अल्प शिक्षित असूनही त्यांनी आपल्या पाचही मुलांना उच्च पदावर पोहोचवले.
गेल्या ४८ वर्षांपासून त्या पती संतोष सिंग परदेशी यांच्यासोबत शेती सांभाळत आहेत. स्वत: फक्त इयत्ता तिसरीपर्यंत शिकलेल्या असूनही त्यांनी आपली पाच अपत्ये त्यातील तीन मुली आणि दोन मुले यांना उच्च शिक्षण देऊन या पंचक्रोशीमध्ये स्वत:चे एक वेगळे स्थान निर्माण केले आहे. दिवस-रात्र शेतातील काम करणे, मुलांसाठी कष्ट करण,े त्यांच्या शिक्षणासाठी स्वत:च्या सुखाचा विचार न करणाऱ्या सौभाग्यवती जिजाबाई यांच्या अपत्यांपैकी मोठा मुलगा व सून यांचे औरंगाबाद येथे हॉस्पिटल आहे. एक मुलगी डॉक्टर, एक मुलगी पुणे येथे वरिष्ठ महाविद्यालयांमध्ये प्रोफेसर व लहान मुलगा पुणे येथे पोलीस उपायुक्त म्हणून कार्यरत आहे.
स्वत: कष्ट करून आपल्या मुलांना उच्च शिक्षण देणाऱ्या अशा या मातेचा या परिसरात आवर्जून उल्लेख केला जातो.