कमी स्ट्राइक रेट तरीही आयपीएलमध्ये ३ हजारांपेक्षा जास्त धावा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 16, 2021 04:15 AM2021-04-16T04:15:32+5:302021-04-16T04:15:32+5:30
इंडियन प्रीमियर लीगमध्ये पाच असे खेळाडू आहेत. ज्यांनी ३ हजारांपेक्षा जास्त धावा केल्या आहेत. मात्र, त्यांचा स्ट्राइक रेट हा ...
इंडियन प्रीमियर लीगमध्ये पाच असे खेळाडू आहेत. ज्यांनी ३ हजारांपेक्षा जास्त धावा केल्या आहेत. मात्र, त्यांचा स्ट्राइक रेट हा खूपच कमी आहे. त्यात सध्या दिल्लीकडे असलेल्या अजिंक्य रहाणे, शिखर धवन यांचा समावेश आहे.
रहाणे याने आयपीएलमध्ये आतापर्यंत १५० सामन्यांत ३९३३ धावा केल्या आहेत. त्याचा स्ट्राइक रेट हा १२१.३८ एवढाच राहिला आहे. तीन हजारांपेक्षा जास्त धावा करूनही त्याचा स्ट्राइक रेट सर्वांत कमी आहे. त्याने राजस्थान रॉयल्स, रायजिंग सुपरजायंट्स पुणे यांच्याकडून खेळ केला आहे. आता तो दिल्लीच्या ताफ्यात आहे. दिल्ली कॅपिटल्सचा सलामीवीर शिखर धवन याने देखील १७७ सामन्यांत ५२८२ धावा केल्या आहेत. तो सर्वाधिक चौकार लगावणाऱ्या फलंदाजांच्या यादीत पहिल्या स्थानावर आहे. त्याने आयपीएलमध्ये ६०१ चौकार लगावले आहेत. तरीदेखील त्याच स्ट्राइक रेट हा १२७.२७ एवढाच आहे. तर त्यासोबतच मनीष पांडे १२१.५८, रायुडू १२६.१८ आणि केकेआरला दोन वेळा विजेतेपद मिळवून देणारा कर्णधार गंभीर १२३.८८ यांचाही स्ट्राइक रेट इतर फलंदाजांच्या तुलनेने कमी आहे. तरीदेखील हे यशस्वी फलंदाज आहे. यातील गंभीर निवृत्त झाला आहे. तर अजिंक्य रहाणेला गेल्या सत्रात फारशी संधी मिळाली नाही. या सत्रात देखील दिल्लीच्या फटकेबाजी करणाऱ्या फलंदाजीत त्याची पारंपरिक फटके मारण्याची शैली वेगळी आहे.
३००० पेक्षा जास्त धावा पण स्ट्राइक रेट कमी असलेले फलंदाज
अजिंक्य रहाणे (दिल्ली) १२१.३८
मनीष पांडे (हैदराबाद) १२१.५९
गौतम गंभीर १२३.८८
अंबाती रायुडू (चेन्नई) १२६.१८
शिखर धवन १२७.२७