रांजणीतील निराधार सुपडाबाईस अखेर मिळणार हक्काचे घर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 7, 2021 04:21 AM2021-07-07T04:21:04+5:302021-07-07T04:21:04+5:30

जामनेर : रांजणी (ता. जामनेर) येथील निराधार सुपडाबाई मगरे हिला घर बांधून देण्याचे वचन प्रहार संघटनेने दिले ...

The destitute Supadabais in Ranjani will finally get their rightful home | रांजणीतील निराधार सुपडाबाईस अखेर मिळणार हक्काचे घर

रांजणीतील निराधार सुपडाबाईस अखेर मिळणार हक्काचे घर

Next

जामनेर : रांजणी (ता. जामनेर) येथील निराधार सुपडाबाई मगरे हिला घर बांधून देण्याचे वचन प्रहार संघटनेने दिले होते. या घराचे भूमिपूजन जिल्हाध्यक्ष विजय भोसले यांनी केले. ‘लोकमत’ने सुपडाबाईच्या व्यथा समाजासमोर मांडल्याने मदतीचा ओघ सुरू झाला होता.

भूमिपूजनप्रसंगी विजय भोसले, देवा महाजन, मनोजकुमार महाले, नीरज खैरनार, उमेश कोळी, भूषण सोनवणे, मयूर पाटील, विशाल हिवाळे, सचिव दीपक उंबरकर, भूषण कानडजे, महेश अहीर, दशरथ पाटील, राहुल मुळे, शिवम माळी, अक्षय कोकाटे, राधेश्याम कोळी, नीलेश दाभाडे, सचिन बोरसे, नीतेश दारकुंडे उपस्थित होते.

सुपडाबाई या शंभर टक्के दिव्यांग असून त्यांच्याकडे मतदान, आधारकार्ड व शिधापत्रिका नसल्याने शासकीय योजनेचा लाभ मिळू शकला नाही. कुटुंबात केवळ वृध्द आईचा असून चरितार्थ चालवणे अवघड बनले होते. प्रहार संघटना व नागरिकांनी वेळोवेळी मदत केली, तसेच प्रशासनाने योजनांचा लाभ मिळण्यासाठी प्रयत्न केले.

Web Title: The destitute Supadabais in Ranjani will finally get their rightful home

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.