तामसवाडी येथे बोरीनदी किनारी गावठी दारू नष्ट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 25, 2021 09:28 PM2021-05-25T21:28:35+5:302021-05-25T21:28:50+5:30
तामसवाडी येथील बोरी नदीच्या काठावर पारोळा पोलिसांनी छापा टाकून ५७ हजार रुपयांची गावठी दारू नष्ट केली.
लोकमत न्यूज नेटवर्क
पारोळा : तालुक्यातील तामसवाडी येथील बोरी नदीच्या काठावर पारोळा पोलिसांनी छापा टाकला असता, त्यात ५७ हजार रुपयांची गावठी दारू नष्ट करण्यात आली व आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.
पारोळा तालुक्यात अवैध गावठी दारूची विक्री सर्रास होत आहे. यात राज्य दारूबंदी राज्य उत्पादन शुल्काच्या दुर्लक्षाने हे प्रकार घडत आहे. तालुक्यात गेल्या काही महिन्यांपासून राज्य उत्पादन शुल्क विभागाने दारूबंदीच्या विरोधात कुठलीही कारवाई केलेली नसल्याचे समजते. दिनांक २४ रोजी दुपारी १ वाजण्याच्या सुमारास पारोळा येथील पोलीस निरीक्षक संतोष भंडारे यांना मिळालेल्या गोपनीय बातमीच्या आधारावर, त्यांनी पोलिसांना तालुक्यातील तामसवाडी येथील बोरी नदीच्या किनारी शरद संतोष भिल (तामसवाडी) हा इसम गावठी दारूच्या भट्टीत दारू तयार करत होता. यावेळी पोलीस उपनिरीक्षक नीलेश गायकवाड, पो.कॉ. सुधीर चौधरी, साबे व इतरांनी छापा टाकला असता, आरोपीस रंगेहाथ पकडले व सुमारे ५७ हजार रुपयांची गावठी दारू नष्ट केली. या प्रकरणी आरोपीविरुद्ध पारोळा पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.