विवरे लोकन्यायालयात ३२ खटले निकाली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 21, 2021 04:12 AM2021-06-21T04:12:23+5:302021-06-21T04:12:23+5:30
कुटुंबातील एक मूल जर शिकले तर संपूर्ण कुटुंब शिक्षित होते, असे रावेर सह दिवाणी न्यायालयाचे न्यायाधीश, आर. एम. लोळगे ...
कुटुंबातील एक मूल जर शिकले तर संपूर्ण कुटुंब शिक्षित होते, असे रावेर सह दिवाणी न्यायालयाचे न्यायाधीश, आर. एम. लोळगे यांनी मार्गदर्शन करताना सांगितले.
वकील संघाचे सचिव ॲड. धनराज पाटील यांनी प्रास्ताविक केले.
यावेळी रावेरचे पोलीस निरीक्षक रामदास वाकोडे, निंभोरा सहाय्यक पोलीस निरीक्षक स्वप्नील उन्नवणे, सावदा सहाय्यक पोलीस निरीक्षक डी.डी. इंगोले, उपनिरीक्षक निलेश वाघमारे, सरपंच युनुस तडवी, भाजप तालुका उपाध्यक्ष वासुदेव नरवाडे, पंचायत समिती सदस्या योगिता वानखेडे, उपसरपंच भाग्यश्री पाटील, बाबूराव पाटील, ग्रामपंचायत सदस्या स्नेहा पाचपांडे, रेखा गाढे, नौशाद बी इस्माइलखा, ज्योती सपकाळ, संदीप पाटील, युसुफ खाटीक, दीपक राणे, दीपक गाढे, मनीषा पाचपांडे, पूनम राणे, पोलीस पाटील योगेश महाजन, पंकज बेंडाळे, मुख्याध्यापक अरूण महाजन यांसह अंगणवाडी सेविका, आशावर्कर व ग्रामस्थ उपस्थित होते. सूत्रसंचालन ॲड. योगेश गजरे यांनी केले.
रावेर न्यायालय सहदिवाणी न्यायाधीश आर. एम. लोळगे, रावेर वकील संघाचे अध्यक्ष ॲड. जगदीश महाजन, सचिव ॲड. धनराज पाटील, सहसचिव ॲड. प्रमोद विचवे, ॲड. योगेश गजरे, न्यायालयीन कर्मचारी आदी उपस्थित होते.