भाजप विरोधकांना हवा ३०० कोटी निधीचा तपशील

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 16, 2018 07:42 PM2018-02-16T19:42:49+5:302018-02-16T19:49:21+5:30

जामनेर नगरपालिकेची पंचवार्षिक निवडणूक जसजशी जवळ येऊ लागली आहे, तसतसे सोशल मीडियावर आरोप - प्रत्यारोपांच्या फैरी झडत आहेत. भाजपाचे विरोधक असलेले काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनादरम्यान शाब्दिक सामना रंगत आहे. शहराच्या विकासासाठी ३०० कोटी रुपये आणल्याच्या दाव्यावर विरोधकांकडून तपशील मागितला जात आहे.

 Details of Rs 300 crore funding to BJP opponents | भाजप विरोधकांना हवा ३०० कोटी निधीचा तपशील

भाजप विरोधकांना हवा ३०० कोटी निधीचा तपशील

Next
ठळक मुद्देसोशल मिडीयातून सुरू झाले आहेत आरोप- प्रत्यारोपभाजपसमर्थकांकडूनही जोरदार प्रत्युत्तरविकास कामांच्या गुणवत्तेबाबत खोचक सवाल

लोकमत आॅनलाईन
जामनेर, दि.१६ :नगरपालिका निवडणूक जवळ येत असतांनाच सोशल मीडियावर त्याची जोरदार चर्चा होत असून भाजप विरोधात राष्ट्रवादी, काँग्रेस व शिवसेना असा शाब्दीक सामना रंगत आहे. जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी विकासासाठी आणलेल्या ३०० कोटीच्या निधीचा तपशील मागून भाजपला कोंडीत पकडण्याचा प्रयत्न विरोधकांकडून होत असल्याचे दिसत आहे.
सर्वच राजकीय पक्षांचे कार्यकर्ते व तरुण सध्या फेसबुकवर मोठ्या प्रमाणावर सक्रीय असून त्यांच्यात होऊ घातलेल्या जामनेर नगरपालिका निवडणुकीचीच चर्चा रंगत आहे.
पालिकेकडून मंजुर झालेल्या कामांच्या भूमिपूजन व पूर्ण झालेल्या कामांचे लोकार्पण कार्यक्रम होत आहेत. शहराच्या विकासासाठी शासनाकडून ३०० कोटी रुपये खेचून आणल्याचा दावा मंत्री महाजन करीत आहे. नेमकी याच विषयाची चर्चा सोशल मीडियावर होत आहे.
असे आहेत आक्षेप
विकासासाठी मिळालेल्या ३०० कोटीबाबत राष्ट्रवादीचे कार्यकर्ते तपशीलाची मागणी करीत आहे. त्याच बरोबर काँग्रेस आघाडीच्या काळातील नगराध्यक्ष पारस ललवाणी यांनी मिळविलेल्या निधीतूनच कामे होत असल्याचा त्यांचा दावा आहे. होत असलेल्या कामाची गुणवत्ता संशयास्पद असल्याची ओरड देखील केली जात असून कामे करीत असलेल्या ठेकेदारांवर मोठ्या प्रमाणात आरोप केले जात आहेत. रस्ते खोदणे, बुजविणे व जलवाहिनीसाठी किंवा भूमिगत गटारीसाठी वारंवार पुन्हा तेच करणे यालाच विकास म्हणतात काय? असा खोचक सवाल विरोधक विचारीत आहे.


 

Web Title:  Details of Rs 300 crore funding to BJP opponents

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.