मुक्ताईनगरात गटविकास अधिकारी यांना घेराव
By admin | Published: July 5, 2017 11:23 AM2017-07-05T11:23:12+5:302017-07-05T11:23:12+5:30
शौचालयाचे अनुदान रखडले : जोंधनखेडा येथील ग्रामस्थांचा संताप
Next
ऑनलाईन लोकमत
मुक्ताईनगर ,दि.5- गेल्या साडेतीन महिन्यांपासून घरकुलाचा दुसरा हप्ता व शौचालय अनुदान रखडल्याच्या कारणास्तव शिवसेना जिल्हा प्रमुखांच्या नेतृत्वात जोंधनखेडा येथील महिला-पुरुषांनी गटविकास अधिका:यांना त्यांच्याच दालनात घेराव घातला. प्रशासन स्तरावर पाठपुरावा करून तत्काळ रकमा अदा होतील या आश्वासनाने हे आंदोलन मागे घेण्यात आले.
मंगळवारी सकाळी 11 वाजता गटविकास अधिकारी संजय बैरागी यांच्या दालनात शिवसेना जिल्हाप्रमुख चंद्रकांत पाटील यांच्या नेतृत्वात 35 ते 40 महिला-पुरुषांनी बैरागी यांना घेराव घातला. जोंधनखेडा येथील 35 घरकुलांचे काम दुस:या टप्प्यार्पयत पूर्ण झाले, तशा शिफारसी ग्रामसेवकातर्फे तीन महिन्यांपूर्वी देण्यात आल्या. तरीदेखील अद्यापर्पयत घरकुलाचा दुसरा हप्ता मिळाला नसल्याची तक्रार यावेळी केली. दुस:या हप्त्याच्या अनुदानाअभावी घरकुलाचे काम प्रलंबित राहिले व ऐन पावसाळ्यात संसार उघडय़ावर आल्याच्या तक्रारी महिलांनी मांडल्या. शौचालय पूर्ण झाले असताना अनुदानासाठी फिरवाफिरव होत असल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे होते. पाऊण तास घेराव घालून आंदोलन सुरू होते.
सरपंच गोदावरीबाई किसन जाधव, शिवराम पवार, हकीम पठाण, दगडू साळुंके, रहिम खाँ, मंगलाबाई कोळी, सुभद्रा साळुंखे, फुलाबाई तडवी, सरदार तडवी, बाळू कांडेलकर, तालुकाध्यक्ष छोटू भोई, सुनील पाटील यांच्यासह 35 ते 40 ग्रामस्थ उपस्थित होते. ग्रामसेवक मनोज घोडके हे 10 ते 15 दिवस येत नाहीत. त्यांच्या गैरहजरीमुळे ग्रामस्थांची कामे प्रलंबित असतात. ग्रामसेवकाची बदली करून नवीन ग्रामसेवक द्यावा, अशी मागणी सरपंच यांनी केले.