२०० कुटुंबांच्या जीवनात आणणार परिवर्तन आणण्याचा अभाविप पूर्व कार्यकर्ता बैठकीत निर्धार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 26, 2017 02:33 PM2017-12-26T14:33:51+5:302017-12-26T14:36:18+5:30

पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी साधला संवाद

Determination to bring about change in the life of 200 family | २०० कुटुंबांच्या जीवनात आणणार परिवर्तन आणण्याचा अभाविप पूर्व कार्यकर्ता बैठकीत निर्धार

२०० कुटुंबांच्या जीवनात आणणार परिवर्तन आणण्याचा अभाविप पूर्व कार्यकर्ता बैठकीत निर्धार

Next
ठळक मुद्देअभाविपचे राष्टÑीय संघटनमंत्री सुनील अंबेकर यांनी केले मार्गदर्शनप्रश्नोत्तरांच्या स्वरूपात पूर्व कार्यकर्त्यांशी साधला संवाद संघाची शाखा जीवन नीट ठेवणारे यंत्र

जळगाव: जिल्ह्यातील अभाविपच्या व संघ परिवारातील कार्यकर्त्यांची १०० जणांची यादी करून त्यांनी प्रत्येकी दोन याप्रमाणे जिल्ह्यातील २०० सामान्य कुटुंबांच्या विकासावर, आर्थिक, शैक्षणिक उन्नतीवर लक्ष केंद्रीत करावे. पुढील वर्षी याचा आढावा घ्यावा. या २०० कुटुंबांच्या जीवनात परिवर्तन आणावे, असा निर्धार अभाविपचे पूर्व कार्यकर्ता व विद्यमान महसूलमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या उपस्थितीत शिवतीर्थ मैदानावर मंगळवार, २६ रोजी आयोजित अभाविपच्या पूर्व कार्यकर्ता बैठकीत घेण्यात आला.
शिवतीर्थ मैदानावर अभाविपच्या सुरू असलेल्या ५२व्या प्रदेश अधिवेशनाला पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी सकाळी ११ वाजता भेट दिली. यावेळी त्यांनी पूर्व कार्यकर्त्यांच्या बैठकीत पूर्व कार्यकर्त्यांशी संवाद साधला. यावेळी अभाविपचे राष्टÑीय संघटनमंत्री सुनील अंबेकर,  राष्टÑीय सहसंघटनमंत्री जी. लक्ष्मण, क्षेत्रीयसह कार्यवाह बाळासाहेब चौधरी, सहकार भारतीचे दिलीप रामू पाटील, संमेलनाच्या स्वागत समितीचे अध्यक्ष अशोक जैन, केशव स्मृती प्रतिष्ठानचे अध्यक्ष भरत अमळकर, अभाविपचे विभाग प्रमुख प्रा.डॉ.मनिष जोशी, महानगरप्रमुख प्रा.भूषण राजपूत, महानगरमंत्री विराज भामरे, सचिन बोरसे उपस्थित होते.
यावेळी पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी प्रश्नोत्तरांच्या स्वरूपात पूर्व कार्यकर्त्यांशी संवाद साधला. जिल्ह्यात संघ परिवारातील वेगवेगळ्या संघटनांमधील विविध क्षेत्रात काम करणाºया कार्यकर्त्यांची संख्या किती? अशी विचारणा केली. त्यावर अंदाजे १० हजार पर्यंत ही संख्या असल्याचे समजल्यावर या लोकांची छाननी करून त्यातून सुरूवातीला केवळ १०० जणांची नावे निवडावीत. त्या १०० लोकांनी जिल्ह्यातील प्रत्येकी दोन सामान्य, गरीब कुटुंबांची निवड करून त्यांच्या जीवनात परिवर्तन आणण्यासाठी प्रयत्न करावेत, अशी सूचना मांडली. ती सर्वांनी एकमताने मंजूर केली. या कुटुंबांच्या आर्थिक उन्नतीसाठी तसेच शैक्षणिक, सामाजिक उन्नतीसाठी वेळोवेळी मदत, मार्गदर्शन करून या कुटुंबांच्या जीवनात परिवर्तन आणण्याचा निर्धार करण्यात आला. पुढील वर्षी याचा आढावा घ्यावा, असे ठरले.
संघाची शाखा जीवन नीट ठेवणारे यंत्र
पालकमंत्री पाटील यांनी उपस्थितांपैकी किती जर नियमित संघाच्या शाखेत जातात? किमान आठवड्याला किती जातात? किंवा स्वत:चे सामाजिक कार्य करतात? अशी विचारणा केली. त्यावर आलेला अल्प प्रतिसाद पाहता त्यांनी सांगितले की, अभाविपने आपल्याला घडविण्यावर आर्थिक नसला तरी वेळ व श्रम खर्च केले आहेत. परिषदेतून बाहेर पडल्यावर त्याचा उपयोग समाजासाठी व्हायला हवा. आणि आगामी काळात जे यंत्र आपल्याला नीट ठेवेल ते यंत्र म्हणजे संघाचीशाखाअसल्याचेसांगितले.

Web Title: Determination to bring about change in the life of 200 family

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.