शिवसेनेचे कार्य प्रत्येकापर्यंत पोहचविण्याचा निर्धार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 17, 2018 12:28 PM2018-07-17T12:28:27+5:302018-07-17T12:28:46+5:30
जळगाव : शिवसेनेचे कार्य शहरातील प्रत्येक नागरिकापर्यंत पोहचविण्याचा निर्धार शिवसेनेच्या बैठकीत रविवारी करण्यात आला. यावेळी माजी मंत्री सुरेशदादा जैन, सहकार राज्यमंत्री गुलाबराव पाटील, आमदार चंद्रकांत सोनवणे, माजी आमदार चिमणराव पाटील, आमदार किशोर पाटील, जिल्हाध्यक्ष गुलाबराव वाघ, महानगराध्यक्ष शरद तायडे, माजी महापौर नितीन लढ्ढा, माजी उपमहापौर सुनील महाजन, विष्णू भंगाळे, शामकांत सोनवणे, दिनेश जगताप, महिला आघाडीच्या प्रमुख महानंदा पाटील उपस्थित होते.
व्यक्तिगत भेटीगाठीला प्राधान्य द्यावे. प्रचाराचे मुद्दे काय असतील, शहराचा सर्वांगिण विकास कसा साधणार आहोत अशा अनेक महत्त्वपूर्ण मुद्यांसंदर्भात चर्चा झाली. कॉर्नर मिटींग घेण्यावर भर द्यावा. गुरूवार, १९ जुलै रोजी शिवसेनेचे ज्येष्ठ नेते संजय सावंत हे शहरात येणार असून त्यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष बैठकीचे आयोजन करण्यात आलेले आहे.
७५ उमेदवार हे निवडून आणण्यासाठीच दिलेले आहे. त्यामुळे ज्या उमेदवारांची परिस्थिती उत्तम आहे त्यासोबतच ज्या उमेदवारांना बळ देण्याची गरज आहे तेथे कार्यकर्त्यांनी जावून त्यांना बळ द्यावे. सुसंवाद साधत असताना कोणतीही टिका टिप्पणी न करता, सामाजिक सुरक्षेची जाणीव ठेवून चाकोरीबद्ध प्रचार कसा करावा, आपली माहिती जास्तीत जास्त लोकांपर्यंत कशी पोहचवावी याविषयी सविस्तर चर्चा झाली. बुथ व्यवस्थापन याविषयी कार्यकर्त्यांच्या नियोजनाबाबत शिक्कामोर्तब करण्यात आले. लोकांसमोर आपण केलेले सद्यस्थितीतील वास्तविक कामे जनतेपर्यंत पोहचविण्याबाबत सविस्तर चर्चा झाली. यावेळी जिल्ह्यातील सर्व तालुका व शहर पदाधिकाऱ्यांना वेगवेगळी जबाबदारी देण्यात आलेली आहे.