विद्यार्थ्यांमधील विविध पैलू विकसित करावे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 25, 2020 03:35 PM2020-01-25T15:35:29+5:302020-01-25T15:39:16+5:30

सध्याच्या स्पर्धेच्या युगात विद्यार्थ्यांमधील हा पैलू विकसित करणे हे शिक्षण व्यवस्थेपुढील आव्हान आहे, असे प्रतिपादन श्री संत गाडगेबाबा अभियांत्रिकी महाविद्यालयातर्फे आयोजित ‘गाडगेबाबा व्याख्यानमाला’ दरम्यान वयाच्या तिशीत पेटंटचे विश्वविक्रम करणारे, २०२० साठी पद्मश्री पुरस्कारासाठी नामांकित झालेले तरुण शास्त्रज्ञ अजिंक्य कोट्टावार यांनी येथे केले.

Develop different aspects of the students | विद्यार्थ्यांमधील विविध पैलू विकसित करावे

विद्यार्थ्यांमधील विविध पैलू विकसित करावे

googlenewsNext
ठळक मुद्देभुसावळ येथे व्याख्यानमालाशास्त्रज्ञ कोट्टावार यांचे प्रतिपादन

भुसावळ, जि.जळगाव : एखाद्या गोष्टीचे आकलन करून घेऊन त्याचे अन्वयार्थ काढण्याची आणि त्याबाबत प्रश्न विचारण्याची क्षमता मनुष्यामध्ये असते. सध्याच्या स्पर्धेच्या युगात विद्यार्थ्यांमधील हा पैलू विकसित करणे हे शिक्षण व्यवस्थेपुढील आव्हान आहे, असे प्रतिपादन श्री संत गाडगेबाबा अभियांत्रिकी महाविद्यालयातर्फे आयोजित ‘गाडगेबाबा व्याख्यानमाला’ दरम्यान वयाच्या तिशीत पेटंटचे विश्वविक्रम करणारे, २०२० साठी पद्मश्री पुरस्कारासाठी नामांकित झालेले तरुण शास्त्रज्ञ अजिंक्य कोट्टावार यांनी येथे केले.
या कार्यक्रमास हिंदी सेवा मंडळाचे अध्यक्ष जे.टी. अग्रवाल, कोषाध्यक्ष एम.डी. तिवारी तसेच प्राचार्य डॉ.आर.पी.सिंह, डीन डॉ.राहुल बारजिभे, विभागप्रमुख डॉ.गिरीष कुळकर्णी, डॉ.पंकज भंगाळे, प्रा.अविनाश पाटील, प्रा.सुधीर ओझा, प्रा.अजित चौधरी, प्रा.दिनेश पाटील व विद्यार्थी उपस्थित होते.
माहितीचे विश्लेषण करण्याची क्षमता निर्माण करा
सध्याच्या माहितीच्या युगात आपल्यावर अनेक ठिकाणांहून माहितीचा अक्षरश: मारा सुरू असतो. ई-मेल, एसएमएस, चॅट, सोशल मीडियावरील पोस्ट असे माहितीचे अनेक स्रोत आहेत. या माहितीचे करायचे काय, हा प्रश्न आहे. सध्याचे युग हे ज्ञानाचे युग आहे, पण फक्त माहिती म्हणजे ज्ञान नव्हे, हे आपल्याला लक्षात घ्यावे लागेल की माहिती साठवत राहवूनही उपयोग नाही. या माहितीचे विश्लेषण करण्याची क्षमता विद्यार्थ्यांमध्ये निर्माण व्हायला हवी आहे, असेही कोट्टावार यांनी सांगितले.
व्याख्यानमाला प्रमुख डॉ.गिरीश कुलकर्णी, आयोजन समिती सदस्य प्रा.अनंत भिडे, प्रा.धीरज पाटील, प्रा.गजानन पाटील, प्रा.संतोष अग्रवाल, प्रा.अतुल गाजरे, प्रा.सचिन हरीमकर, प्रा. दीपक खडसे, विजय विसपुते यांनी परिश्रम घेतले.
 

Web Title: Develop different aspects of the students

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.