विकास हाच श्वास आणि ध्यास असलेला नेता : खासदार उन्मेष पाटील
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 24, 2021 04:13 AM2021-06-24T04:13:45+5:302021-06-24T04:13:45+5:30
यासोबतच वनजीबाबा मंडळातर्फे अध्यापक विद्यालय, सौ. शांतीदेवी चव्हाण पॉलिटेक्निक आदींद्वारे त्यांनी तालुक्यात शिक्षणाची गंगा आणली. एम.एस्सी. (पर्यावरणशास्त्र) एम.एड. केलेल्या ...
यासोबतच वनजीबाबा मंडळातर्फे अध्यापक विद्यालय, सौ. शांतीदेवी चव्हाण पॉलिटेक्निक आदींद्वारे त्यांनी तालुक्यात शिक्षणाची गंगा आणली.
एम.एस्सी. (पर्यावरणशास्त्र) एम.एड. केलेल्या संपदा यांनी २००५ मध्ये उन्मेष यांच्या आयुष्यात पत्नीच्या रूपात प्रवेश केला. सृष्टी, स्वामी आणि समर्थ या अपत्यांनी त्यांच्या घराचे गोकूळ केलेय. शिक्षणावर नितांत प्रेम करणाऱ्या उन्मेष यांचा शेती हा ‘श्वास’ आणि शेतकऱ्यांची समृध्दी ‘ध्यास’ होता. त्यातूनच त्यांनी पाच हजार एकरावर ‘करार शेती ’चा यशस्वी प्रयोग करून शेतकऱ्यांना विकासाचा मार्ग दाखविला. चार तालुक्यांचे कार्यक्षेत्र असलेला ‘बेलगंगा’ साखर कारखाना विक्री न करता भाडेतत्वावर सुरू व्हावा यासाठी त्यांनी पदयात्रा, जनजागृती अभियान आदी
माध्यमातून तालुक्यात मोठे आंदोलन उभारले. शेतकरी आणि युवकांचा थेट जिल्हा बँकेवर मोर्चा काढून संचालकांसमोर शेतकऱ्यांच्या अडचणी मांडल्या होत्या. उन्मेष पाटील यांच्या मित्रमंडळाच्या माध्यमातून तालुकाभर असंख्य उपक्रमांचा जणू धडाका लावला.
तालुक्यातील युवक चळवळीचे नेतृत्व करणारा हा उमदा तरुण भारतीय जनता पक्षाचा सक्रिय सदस्य, पदाधिकारी झाला. आणि त्यांच्यातील नेतृत्वगुण हेरत गुणवत्तेच्या बळावर पक्षाने त्यांना २०१४ च्या विधानसभा निवडणुकीत चाळीसगाव मतदारसंघातून उमेदवारी दिली. आणि पक्षाच्या विश्वासाला पात्र ठरत २२ हजारांहून अधिक मताधिक्य मिळवत त्यांनी विजय संपादन केला.
लोकप्रतिनिधी म्हणून त्यांनी तालुक्याला जागतिक दर्जाची गणित नगरी मंजूर करण्यासोबतच पर्यटन विकासाकडेही लक्ष दिले. १ हजार कोटींहून अधिकचे उद्योग चाळीसगाव औद्योगिक वसाहतीमध्ये आणून रोजगार निर्माण केला. शेतकऱ्यांसाठी जिल्ह्यात सर्वाधिक निधी आणि अनुदान आणले. आपल्या शिक्षणाचा व कौशल्याचा वापर करत शासकीय योजना तळागाळात पोहचवण्यासाठी ‘शासकीय योजनांची जत्रा’ व ‘ समाधान शिबिर’ असे अभिनव उपक्रम राबविले. या उपक्रमांचे कौतुक मुख्यमंत्र्यांसह राज्यभरात केले गेले. आज चाळीसगाव तालुक्यात एकही रस्ता असा नसेल ज्यासाठी त्यांनी निधी आणून काम सुरू केले नसेल. शहरासाठी अंतर्गत ७१ कोटींची पाणीपुरवठा योजना, भुयारी गटार (पहिला टप्पा) ६८ कोटी, नदी सुशोभिकरण, एलईडी पथदिवे आदी कोट्यवधींची कामे मंजूर करून आणली. विधानसभेत आपल्या अभ्यासपूर्ण भाषणांनी जळगाव जिल्ह्यासह खानदेशातील सिंचन, पाणी, रस्ते आदी विषयांवर आवाज उठवला.
२०१९ लोकसभा निवडणुकीत पुन्हा एकदा मोदी सरकार स्थापन होण्यासाठी राज्यातील प्रत्येक लोकसभा मतदारसंघ महत्त्वाचे होते. पक्ष कोणत्याही स्थितीत जोखीम घेण्यास तयार नसल्यामुळे जळगाव लोकसभा मतदारसंघातून आमदार उन्मेष पाटील यांना ऐनवेळी उमेदवारी देण्यात आली. अवघे २० दिवस इतक्या कमी वेळेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व गिरीश महाजन यांच्या मार्गदर्शनाने शिस्तबद्ध प्रचार यंत्रणा कामाला लावत राज्यात दुसऱ्या क्रमांकाच्या ४ लाख ११ हजार मताधिक्याने त्यांनी विजय मिळविला. अनेक विषयांच्या पाठपुराव्यात नेहमीच प्रयत्नशील राहिले. संसदेच्या अधिवेशनात सात्यत्याने विविध विषयावरील चर्चेत सहभागी झाले. याचा परिणाम असा झाला की देशातील टॉप २५
खासदारांमध्ये येण्याचा मान खासदार उन्मेष पाटील यांना मिळाला. सतत जनतेशी संवाद आणि संपर्क ठेवून असल्यामुळे गेल्या वर्षात अधिकतर वेळ कोरोना रुग्णांच्या सेवा सुविधेसाठी व्यतीत होत असताना संपर्काची गल्ली ते दिल्ली नाळ अतूट ठेवण्यासाठी त्यांची धडपड सुरू आहे आणि यापुढेही सुरू राहील.
शब्दांकन : सुनील रणदिवे पाटील,
खासदार, जनसंपर्क कार्यालय प्रमुख, चाळीसगाव