भविष्यात देवेंद्र फडणवीस हेच मुख्यमंत्री - गिरीश महाजन 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 30, 2019 12:00 PM2019-06-30T12:00:14+5:302019-06-30T12:00:51+5:30

पक्षातून कोणी गेले तरी फरक नाही 

Devendra Fadnavis is the Chief Minister - CM Girish Mahajan | भविष्यात देवेंद्र फडणवीस हेच मुख्यमंत्री - गिरीश महाजन 

भविष्यात देवेंद्र फडणवीस हेच मुख्यमंत्री - गिरीश महाजन 

Next

जळगाव : पक्षातून कोणी गेले फरक पडत नाही. अगदी मी गेलो तरी फरक पडणार नाही. हा पक्ष नेत्यांचा नसून कार्यकर्त्यांचा आहे. पक्ष म्हणजे कुणाची खाजगी मालमत्ता नसून येथे घराणेशाहीही चालत नाही. मी म्हणून पक्ष असे आता कोणीही समजू नये, भविष्यात यश भाजपाचेच असून देवेंद्र फडणवीस हेच मुख्यमंत्री असतील,  असे प्रतिपादन  जलसंपदा मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री गिरीश महाजन यांनी शनिवारी पक्षाच्या  बैठकीत केले.
भाजपाची महागनर आणि ग्रामीणची बैठक ब्राह्मण संघाच्या सभागृहात शनिवारी दुपारी झाली.   बैठकीस माजी मंत्री आमदार एकनाथराव खडसे, खासदार रक्षा खडसे, खासदार उन्मेश पाटील, प्रभारी जिल्हाध्यक्ष डॉ. संजीव पाटील, महानगर जिल्हाध्यक्ष आमदार सुरेश भोळे,  आमदार चंदुलाल पटेल, आमदार स्मिता वाघ, आमदार हरिभाऊ जावळे, आमदार संजय सावकारे, जि.प. अध्यक्ष उज्ज्वला पाटील, महापौर सीमा भोळे , विभाग संघटनमंत्री किशोर काळकर , नंदुरबारचे जिल्हाध्यक्ष विजय चौधरी , माजी जिल्हाध्यक्ष सुनील बढे , उदय वाघ,  जि . प . उपाध्यक्ष  नंदकुमार महाजन, सभापती पोपट भोळे, माजी आमदार डॉ. बी. एस . पाटील, जिल्हा बॅँकेच्या अध्यक्षा अ‍ॅड. रोहिणी खडसे - खेवलकर, डॉ शशिकांत वाणी आदी उपस्थित होते .  
परिश्रमाचे यश
पाच वर्षातील कामांमुळे पक्षाला अभूतपूर्वी विजय मिळाला असे सांगून खडसे पुढे म्हणाले, स्व. प्रमोद महाजन नेहमी भाषणात जळगावचा उल्लेख करत.  मिळालेल्या यशाचा आनंद आहे मात्र आश्चर्य वाटत नाही असे आपण त्यांना म्हणालो, हे यश आतापासून नाही तर १९८९ ते २०१९ या काळात सतत मिळत आले आहे.
अनेक जण नमस्कार घाबरत करतात
आज पक्षात अनेक नवीन चेहेरे दिसताय, ७० टक्के चेहेरे पहाता आपण त्यांना ओळखतही नाही. काही जण तर नमस्कारही घाबरत करतात. त्यांनाही पक्षाने स्विकारले. भाजपला निवडून आणायचे हेच सर्वांचे ध्येय आहे. ११ जागा जिंकायच्या आहेत.  या जिल्ह्यातील सर्व संस्था पक्षाच्या ताब्यात आहे मग विधानसभा नको का? असा प्रश्न करून कामाला लागा हवेत राहू नका, असेही ते म्हणाले. प्रास्ताविक आमदार सुरेश भोळे यांनी केले. सूत्रसंचालन प्रा. सुनील नेवे यांनी केले. 
५० वर जागा कॉँग्रेस, राष्टÑवादील मिळणार नाही
आगामी निवडणुकीत कॉँग्रेस, राष्टÑवादीला ५० च्यावर जागा मिळणार नाहीत, हे आपण हिमतीने सांगतो. त्यामुळे या पक्षाचे कार्यकर्तेच काय नेतेही तेथे रहायला तयार नाहीत. या जिल्ह्यासाठी मी तीन महिन्यांचा पालकमंत्री आहे.  पूर्वी बरीच कामे झाली आहेत, विकास निधीही मिळाला आहे. त्या जोरावर जिल्ह्यातील अकराच्या अकरा जागा आपल्याला जिंंकायच्या आहेत. आता रडायचे नाही लढायचे आहे. 
ए.टी. पाटील गेले फरक पडला नाही
महाजन पुढे म्हणाले, माझा पक्ष या सिद्धांतावर अनेकांनी पूर्वी काम केले म्हणून हा पक्ष वाढला. ए.टी. पाटील यांच्या सारख्यांना पक्षाने दोन वेळा खासदारकीची संधी गेली.   जात-पात सारी बंधणे तोडून जनतेने मोदींच्या नेतृत्वावर विश्वास ठेवला आणि ३०३ जागांवर यश दिले. केंद्रात मोदी तसे राज्यात देवेंद्र फडणवीस जनतेला पाहीजे आहेत,  बहुतांश मनपा निवडणुकांमध्ये पक्षाला यश मिळाले. आज सगळीकडे बोलबाला आपलाच आहे. 
भाजपला हरविणे हाच सर्वांचा अजेंडा
लोकसभा निवडणुकीत यश मिळाले तेच विधानसभेत असेल या भ्रमात राहू नका निवडणुकांनुसार समिकरणे बदलतात, यासह भाजपला हरविणे हाच विरोधी व मित्र पक्षांचाही अजेंडा असेल त्यामुळे सजग राहून कामे करा असे सल्ला यावेळी माजी मंत्री एकनाथराव खडसे यांनी कार्यकर्त्यांना दिला.

Web Title: Devendra Fadnavis is the Chief Minister - CM Girish Mahajan

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Jalgaonजळगाव