पुण्यकाळ साधत भाविकांनी घेतले कार्तिक स्वामींचे दर्शन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 13, 2019 12:11 PM2019-11-13T12:11:57+5:302019-11-13T12:12:29+5:30

विविध धार्मिक कार्यक्रम : श्री अयप्पा स्वामी मंदिरात गर्दी

The devotees of Kartik Swami took a long time | पुण्यकाळ साधत भाविकांनी घेतले कार्तिक स्वामींचे दर्शन

पुण्यकाळ साधत भाविकांनी घेतले कार्तिक स्वामींचे दर्शन

googlenewsNext

जळगाव : कार्तिक पौर्णिमेनिमित्त शहरातील कार्तिक स्वामींच्या मंदिरामध्ये कार्तिक पौर्णिमा उत्सव उत्साहात साजरा करण्यात येऊन भाविकांनी मनोभावे दर्शन घेतले. मुहूर्तावर अभिषेक, पूजा विधीसाठी भाविकांनी विशेषत: महिलांनी निवृत्तीनगरातील मंदिरावर प्रचंड गर्दी केली होती़ १२ रोजी रात्री ८.२१ वाजेपासून ते १३ रोजी रात्री ८.३० वाजेपर्यंत पुण्यकाळ असल्याने भाविकांनी दर्शनासाठी गर्दी केली. १३ नोव्हेंबर रोजी ८.३० वाजेपर्यंत कार्तिक स्वामींचे मंदिर दर्शनासाठी खुले ठेवण्यात येणार आहे़
केरळी महिला ट्रस्टतर्फे निवृत्तीनगरात स्थापन करण्यात आलेल्या श्री अय्यप्पा स्वामी मंदिरामध्ये १२ रोजी विविध कार्यक्रम झाले. यंदा पौर्णिमा समाप्तीनंतर कृतिका नक्षत्रास सुरुवात झाली. या कृतिका नक्षत्रात कार्तिक स्वामींच्या दर्शनासाठी अनन्य महत्त्व असल्याने १२ रोजी रात्री ८.२१ वाजता कृतिका नक्षत्रास सुरुवात झाल्याने कार्तिक महिना, कृतिका नक्षत्र व त्यात कार्तिक स्वामींचे दर्शन असा पवित्र योग १३ रोजी रात्री ८.३० वाजेपर्यंत असल्याने या काळात दर्शनासाठी गर्दी झाली. मंगळवारी अनेक जणांनी अभिषेक करून घेतले.
मध्यरात्रीपर्यंत गर्दी कायम
मंगळवारी दुपारपासून मध्यरात्रीपर्यंत गर्दी कायम होती़ मंगळवारी संध्याकाळी पौर्णिमा समाप्ती असली तरी त्यानंतर कृतिका नक्षत्रास सुरुवात झाल्याने व ते बुधवारी रात्रीपर्यंत असल्याने दुसऱ्या दिवशीही गर्दीत वाढ होईल, असे केरळी महिला ट्रस्टच्या अध्यक्षा वासंती अय्यर यांनी सांगितले़
३३ वस्तूंचा मुहूर्तावर अभिषेक
पौर्णिमेचा मुहूर्त साधत कार्तिक स्वामींवर दागिने, फळांचा रस, चंदन अशा एकूण ३३ वस्तूंचा अभिषेक करण्यात आला़ यानंतर आरती करण्यात येवून हरभºयाची उसळ प्रसादाचे भाविकांना वाटप करण्यात आले़ कृतिका नक्षत्राच्या मुहूर्तावर अभिषेक केल्याने मनोकामना पूर्ण होत असल्याने तरुण, महिलांसह, दाम्पत्यांनी गर्दी केली़ त्यांच्यासाठी अभिषेकासाठी स्वतंत्र व्यवस्था करण्यात आली होती़
मोरपिसांची विक्री
कार्तिक स्वामींचे मोर हे वाहन आहे़ दर्शनासाठी येताना भाविक सोबत मोराचे पीस घेवून येतात़ कार्तिक स्वामींच्या पायाला या मोरांचा स्पर्श करून ते घराच्या देव्हाºयात ठेवल्यास आरोग्य व सुखसमृध्दी नांदते, अशी श्रध्दा असल्याचे सांगण्यात आले. यामुळे विके्रेत्यांनी निवृत्तीनगर येथे मंदिर परिसरात मोरपिस उपलब्ध करून दिले होते.
ट्रस्टच्या अध्यक्षा वासंती अय्यर, श्रीजा अशोकन, रजनी प्रदीप, श्रीजा शामलन, संधी दामोदरन, शुभा वेणुगोपाल, जानकी दामोदरन, राजी नायर, राजी शशी, तनुजा अजीत, गंगा संजीवन, जिनीया अजू, बिंदू उन्नीकृष्णन, सोफी सुनील यासह पुरुष मंडळींचेही सहकार्य मिळाले.

Web Title: The devotees of Kartik Swami took a long time

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Jalgaonजळगाव