भक्तीगीत, गवळणीतून नृत्याविष्कार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 18, 2019 10:39 PM2019-11-18T22:39:12+5:302019-11-18T22:39:48+5:30
‘अनोख्या अनुभूती’ने जिंकली मने : प्रभाकर संगीत कला अकादमीतर्फे आयोजन
जळगाव : भजन, भक्तीगीत, गवळण अशा विविध प्रकारातील उपशास्त्रीय गायन शैलीवर आधारीत सादर करण्यात आलेल्या नृत्याविष्काराने शहरवासीयांची रविवारची संध्याकाळ संस्मरणीय ठरली. निमित्त होते, मायादेवी नगरातील रोटरी भवन येथे प्रभाकर संगीत कला अकादमीच्यावतीने आयोजित ‘एक अनुभव नृत्याविष्काराचा’ या कार्यक्रमाचे.
यावेळी ‘लोकमत’चे निवासी संपादक मिलिंद कुलकर्णी, रायसोनी इंस्टिट्यू आॅफ मॅनेजमेंटच्या संचालिका डॉ. प्रीती अग्रवाल, अकादमीच्या संचालिका डॉ. अपर्णा भट-कासार, किरण कासार यांची प्रमुख उपस्थिती होती.
तेजस मराठे, राधिका सरोदे (तबला), कपिल शिंगाणे, शिवानी जोशी (संवादिनी), कोमल चौव्हाण (पढंत) यांनी साथसंगत केली. कोमल चौव्हाण, मृणाल सोनवणे, राधिका सरोदे, शिवानी जोशी, ऋतुजा महाजन, हिमानी पिले, मृण्मयी कृलकर्णी, सानिका कानगो या अकादमीतील वरिष्ठ विद्यार्थिंनी डॉ.अपर्णा भट-कासार यांच्या मार्गदर्शनाखाली या कार्यक्रमाची नृत्य रचना केली होती. यावेळी डॉ. प्रीती अग्रवाल म्हणाल्या की, डॉ. अपर्णा भट-कासार यांच्या अकादमीच्या पहिल्या बॅचमध्ये माझी कन्या विद्यार्थिनी होती, असे सांगत त्यामुळेच डॉ. अपर्णा भट यांची कथ्थक क्षेत्रातील तपश्चर्या व साधनेची मी एक साक्षीदार असल्याचा अभिमान असल्याचे त्यांनी नमूद केले. सूत्रसंचालन मृणाल सोनवणे व राधिका सरोदे यांनी केले तर भाग्यश्री पाटील हिने आभार मानले. प्रास्ताविक हिमानी पिले यांनी केले तर मधुरा इंगळे यांनी परिचय करून दिला. स्वाती पाटील, कपील शिंगाणे, तेजस मराठे, विजय टेलर, रुपेश महाजन, मिलिंद थत्ते, विजय डोहोळे, समीर दीक्षित, भूषण जोशी यांचा सत्कार करण्यात आला.
नृत्य कलावंतांचे बहारदार सादरीकरण
गणेश वंदना व पारंपारिक कथ्थक नृत्याने कार्यक्रमाची सुरुवात झाली. आरोही सोले, भाग्यश्री पाटील, भार्गवी खैरनार, मधुरा इंगळे, मानसी वाणी, पूर्वा कुलकर्णी, भावना सुलक्षणे, तेजस्वीनी क्षिरसागर, तनवी बागुल, स्वानंदी बोरसे, शर्मीष्ठा पाटील, रिद्धी सोनवणे, प्रणिता पवार, दीपश्री जाधव, अपूर्वा पाटील, आयुश्री दशपुत्रे, आनंदी याज्ञिक, आर्या सराफ, दिक्षा चौधरी, गौरी वाठ, जान्हवी पाटील, कस्तुरी नंदर्षी, नुपूर मगर, पूर्वा झारे, सिद्धी राणे, वृषाली झांबरे, स्वरा नेहते, संस्कृती गवळे, वैदेही चौधरी, समिक्षा सोनवणे या विद्याथीर्नींनी भजन, भक्तीगीत, तराणा, गवळण इत्यादी उपशास्त्रीय गायन शैलीवर आधारीत नृत्य सादर केले. या बहारदार सादरीकरणाने उपस्थित रसिक मंत्रमुग्ध झाले.