निवडणुकीची परिसरात धामधूम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 10, 2021 04:12 AM2021-01-10T04:12:53+5:302021-01-10T04:12:53+5:30

नशिराबाद : ग्रामपंचायत निवडणुकीचे वातावरण परिसरातील गावात चांगलेच तापत आहे. प्रचाराचा धुरळा उडत असल्याने सर्वत्र धामधुमीचे वातावरण निर्माण झाले ...

Dhamdhum in the election area | निवडणुकीची परिसरात धामधूम

निवडणुकीची परिसरात धामधूम

Next

नशिराबाद : ग्रामपंचायत निवडणुकीचे वातावरण परिसरातील गावात चांगलेच तापत आहे. प्रचाराचा धुरळा उडत असल्याने सर्वत्र धामधुमीचे वातावरण निर्माण झाले आहे. मात्र नशिराबादला ग्रामपंचायत निवडणुकीतील इच्छुक उमेदवारांनी माघारी घेऊन इतिहास रचला आहे व नगरपंचायतीची निवडणूक व्हावी, अशी मागणी केली आहे. प्रशासनाचा व न्यायालयाचा निर्णय अद्याप आलेला नाही त्यामुळे सध्या तरी निवडणुकीची नशिराबादला सामसूमच आहे.

आज आपल्या गावची निवडणूक असती तर आपल्याकडे वर्दळ रेलचेल गल्लोगल्ली धामधूम दिसली असती हे मात्र तितकेच खरे, अशी कोपरखळी रंगत आहे. परिसरातील गावात होत असलेल्या निवडणुकीच्या घडामोडी, उमेदवार, त्यांचा प्रचार याबाबतच्या चर्चा मात्र गावात रंगत आहेत.

परिसरातील गावे लहान असली तरी राजकीयदृष्ट्या ते मात्र महत्त्वपूर्ण आहे. परिसरातील आसोदा, भादली, जळगाव खुर्द, तरसोद आदी गावांमध्ये होत असलेल्या निवडणुकींच्या लढती व प्रचाराचा उडत असलेला धुराळा लक्षवेधक आहे. त्यात कोण बाजी मारते याकडे सर्वांचे लक्ष लागले. याबाबतची चर्चा मात्र आता सध्या गावात सुरू आहे. गावात निवडणूक होत नसली तरी परिसरातील गावांच्या लढती, उमेदवारांमधील प्रचाराची व्यूहरचना कार्यप्रणाली याबाबतच्या चर्चा होताना दिसत आहेत. येथे नगरपंचायत उद्घोषणा झाल्याने ग्रामपंचायतऐवजी नगरपंचायतीची निवडणूक व्हावी यासाठी नशिराबाद येथे ८२ पैकी ८१ उमेदवारांनी सामूहिक माघार घेतल्याने इतिहास रचला आहे. त्यातही एका जणाने माघार न घेतल्याने तोही इतिहास घडत आहे. त्यामुळे १६ जागा रिक्त असून एक जागा बिनविरोध झाली आहे. तेव्हा नशिराबादला निवडणुकीची सामसूम असली तरी परिसरातील गावांची धामधुमीची चर्चा मात्र गावात रंगत आहे.

Web Title: Dhamdhum in the election area

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.