लोकशाही हवी की हुकमशाही, हे ठरवणारी निवडणूक  - धनंजय मुंडे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 21, 2019 07:48 PM2019-04-21T19:48:28+5:302019-04-21T19:49:36+5:30

चाळीसगाव येथे महाआघाडीची सभा

Dhananjay Munde, the deciding candidate for democracy or dictatorship | लोकशाही हवी की हुकमशाही, हे ठरवणारी निवडणूक  - धनंजय मुंडे

लोकशाही हवी की हुकमशाही, हे ठरवणारी निवडणूक  - धनंजय मुंडे

Next


चाळीसगाव - ही निवडणूक आणि तूमचे एक मत केवळ एका जिल्ह्याच्या उमेदवाराचे भवितव्य ठरवणारे नाही तर या देशातली लोकशाही टिकवायची का नरेंद्र मोदी यांची हुकूमशाही आणायची हे ठरवणारी निवडणूक आहे. त्यामुळेच विचारपूर्वक मतदान करा असे आवाहन विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी केले आहे. तसेच भाजपचा जळगावचा उमेदवार हा हफ्तेखोर आहे, अवैध धंदे त्याच्या नावावर आहेत अशा हफ्तेखोरांच्या हाती जळगावची सत्ता द्याल का ? असा सवालही मुंडे यांनी उपस्थित केला.
महाआघाडीचे जळगाव मतदारसंघाचे उमेदवार गुलाबराव देवकर यांच्या प्रचारार्थ चाळीसगाव येथे मुंडे यांची जाहीर सभा झाली त्यावेळी ते बोलत होते. यावेळी मुंडे म्हणाले की, मी प्रचाराच्या निमित्ताने अवघा महाराष्ट्र फिरत आहे . मात्र मला कुठेही मोदींची लाट दिसत नाही, देशात सध्या लाट नाही महाआघाडीचे वादळ आहे. या वादळात कमळाच्या पाकळ्या अशा उडून जातील की अमित शाह आणि मोदी बसले तरी त्यांना पाकळ्या मोजता येणार नाही इतकी वाईट अवस्था सध्या भाजपची आहे. सरकारच्या धोरणांवर टीका करूय मोदी हे नैराश्यातून पवार यांच्यावर टीका करत आहेत, असे म्हणत त्यांनी पंतप्रधान मोदींचा समाचार घेतला.
शहीदांबद्दल चुकीचे बोलणाऱ्यांना लाज नाही का?
भाजपच्या उमेदवार साध्वी प्रज्ञासिंह शहीद हेमंत करकरेंबाबत वाट्टेल ते बोलत आहे. आणि याचंं मोदींतर्फे समर्थन केले जात आहे. मोदींना लाज वाटत नाही का ? असा संतप्त सवाल त्यांनी उपस्थित केला.
यावेळी आमदार हरिभाऊ राठोड, उमेदवार गुलाबराव देवकर, माजी आमदार राजीव देशमुख , अशोक खलाणे, आर.के.पाटील, समाधान पाटील यांनी मनोगत व्यक्त केले. व्यासपीठावर माजी आमदार मनीष जैन, दिलीप सोनवणे, रंगनाथ काळे, राष्ट्रवादी काँग्रेस जिल्हा अध्यक्ष रवींद्र पाटील, ओबीसीचे प्रदेश अध्यक्ष प्रमोद मोरे, शशिकांत साळुंखे, प्रदीप देशमुख, अनिल निकम, कल्पना पाटील, दिनेश पाटील, श्याम देशमुख, ईश्वर जाधव, विजय जाधव, सोनल साळुंखे,आदी उपस्थित होते. सूत्रसंचालन रामचंद्र जाधव यांनी तर आभार दिनेश पाटील यांनी मान्ले. यावेळी खासदार ए.टी. पाटील यांचे साडू समाधान पाटील यांचे सह अनेकांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला.

Web Title: Dhananjay Munde, the deciding candidate for democracy or dictatorship

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.