धानोरा सेंट्रल बँक कनेक्टिव्हिटी चार दिवसांपासून बंद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 5, 2019 08:22 PM2019-08-05T20:22:32+5:302019-08-05T20:23:04+5:30
धानोरा, ता.चोपडा : येथील सेंट्रल बँक आॅफ इंडिया शाखेची कनेक्टिव्हिटी गेल्या चार ते पाच दिवसांपासून बंद पडली आहे. त्यामुळे ...
धानोरा, ता.चोपडा : येथील सेंट्रल बँक आॅफ इंडिया शाखेची कनेक्टिव्हिटी गेल्या चार ते पाच दिवसांपासून बंद पडली आहे. त्यामुळे बँकेचे सर्व व्यवहार ठप्प झाल्याने ग्राहकांचे हाल होत आहेत.
येथे सेंट्रल बँकेची शाखा असून येथे एक आठवड्याआड कनेक्टिव्हिटी बंद पडते, यामुळे नागरिकांच्या मनात बँकेच्या प्रशासनाबाबत शंका निर्माण होत आहेत. १ ते ५ आॅगस्टदरम्यान बँक व्यवहार सुरळीत न झाल्याने ग्राहकांना रोख रक्कम काढता वा टाकता आली नाही. तसेच इतर कामेही न झाल्याने ग्राहकांना रिकाम्या हाती परतावे लागले. बँक व्यवहार त्वरित सुरळीत करावेत, अशी मागणी परिसरातील नागरिकांतून होत आहे. बँकेची सुरक्षा वाऱ्यावर
या बँकेला सुरक्षारक्षक नसल्याने याआधी एटीएममधून चार लाख रुपये चोरट्यांनी लंपास केले होत. यामुळे बँकेची सुरक्षा वाºयावर दिसत आहे. याबाबत अडावद पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक योगेश तांदळे यांनी बँक व्यवस्थापक यादव यांना सुरक्षेबाबत सूचना दिल्या आहेत.