धरणगावला ‘जनता कर्फ्यू’च्या दुसऱ्या दिवशी कडकडीत बंद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 8, 2020 04:39 PM2020-06-08T16:39:13+5:302020-06-08T16:39:42+5:30
प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून शहरवासीयांनी स्वंयस्फूर्तीने व्यापाऱ्यांच्या सहकार्याने पाच दिवसीय ‘जनता कर्फ्यू’ जाहीर केला असून, पहिल्या दिवशी शहरवासीयांनी कडकडीत बंद पाळून बंद यशस्वी केला.
धरणगाव, जि.जळगाव : शहरासह तालुक्यात कोरोना रुग्णांमध्ये होत असलेली झपाट्याची वाढ शहाराला धोकेदायक ठरू पाहत आहे. यावर प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून शहरवासीयांनी स्वंयस्फूर्तीने व्यापाऱ्यांच्या सहकार्याने पाच दिवसीय ‘जनता कर्फ्यू’ जाहीर केला असून, पहिल्या दिवशी शहरवासीयांनी कडकडीत बंद पाळून बंद यशस्वी केला. दुसºया दिवशीही चांगला प्रतिसाद मिळाला.
अत्यावश्यक सेवेतील कृषी केंद्र , दूध डेअरी , मेडिकल दुकाना यांना दिलेल्या वेळेनुसार सुरू ठेवून दिलेल्या वेळेवर दुकाने बंद केली व शिस्तीचे पालन केले. ‘जनता कर्फ्यू’वर नियंत्रण समितीने फेरफटका मारुन खात्री केली. यासाठी सर्व व्यापारी, राजकीय पक्षांचे पदाधिकारी, नगरसेवक, सपोनि पवन देसले व पोलीस कर्मचाºयांचे सहकार्य लाभले.