धरणगाव तालुका अर्धशतक पार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 9, 2020 08:48 PM2020-06-09T20:48:17+5:302020-06-09T20:48:58+5:30
एकाच दिवशी ८ रुग्ण पॉझिटिव्ह, एकूण बाधित झाले ५१
धरणगाव : ९ रोजी शहरात एकूण ८ कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळल्याने एकूण बाधितांची संख्या आता ५१ झाली आहे. तर अजून पावेतो ३७ संशयीतांचे रिपोर्ट प्रलंबीत आहे. ८ बाधितांमध्ये बजरंग चौक मराठे गल्लीतील ७ रुग्ण तर चिंतामणी मोरीया नगर मधील १ रुग्णाचा समावेश असल्याची माहिती नायब तहसिलदार प्रथमेश मोहोळ यांनी दिली. या सर्व परिसराला प्रशासनाने सील केले. दरम्यान ५१ पैकी ४ जणांचा मृत्यू झाला आहे.तर एकूण १३ रुग्ण बरे होवून घरी परतले आहेत.
धरणगावच्या कॉलनी परिसरात कोरोनाचा शिरकाव झाल्याने कॉलनीवासीयांमध्ये धडकी भरली आहे. ८ रोजी येथील नवदत्तदुर्ग नगरमध्ये एक रुग्ण आढळला होता.
पाळधीचा संशयीत मयत
पाळधी, ता. धरणगाव : येथे १ कोरानासंशयी तरुग्ण मयत झाला असून त्याच्यावर जळगाव येथे अंत्यसंस्कार करण्यात आले. तो पाळधी खुर्द येथील गोविंद नगरचा रहिवासी होता.