शेतकरी कजर्माफीसाठी धरणगावला ऐतिहासिक मोर्चा

By admin | Published: May 20, 2017 01:55 PM2017-05-20T13:55:53+5:302017-05-20T13:55:53+5:30

राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे ‘शेतकरी संघर्ष मोर्चा’ काढण्यात आला.

Dharanggaon Historical Front for Farmer's Charter | शेतकरी कजर्माफीसाठी धरणगावला ऐतिहासिक मोर्चा

शेतकरी कजर्माफीसाठी धरणगावला ऐतिहासिक मोर्चा

Next

ऑनलाइन लोकमत

जळगाव, दि. 20 - शेतक:यांना कर्जमाफी मिळावी, कापसाला 7 हजार भाव मिळावा यासह विविध मागण्यांसाठी धरणगाव येथे शनिवारी राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे ‘शेतकरी संघर्ष मोर्चा’ काढण्यात आला.  माजी मंत्री गुलाबराव देवकर यांच्या नेतृत्वाखाली काढण्यात आलेल्या या मोर्चात हजारो शेतकरी सहभागी झाले होते.  शेतक:यांठीचा हा ऐतिहासिक मोर्चा ठरला.
बालाजी मंदिरापासून निघालेला मोर्चा शहरातील प्रमूख मार्गावरून उड्डाणपुलामार्गे तहसील कार्यालयात पोहचला. यावेळी गुलाबराव देवकर, गफ्फार मलिक, विलास पाटील, रमेश माणिक पाटील यांनी आपल्या भाषणातून भाजपा-सेना सरकार वर व सहकार राज्यमंत्री गुलाबराव पाटील यांच्यावर  टिकास्त्र सोडले. तहसीलदार प्रशांत बोरकर यांना मागण्यांचे निवेदन देण्यात आले.
यावेळी शिवसेनेतून राष्ट्रवादीत प्रवेश केलेले रमेश माणिक पाटील यांनी मंञी गुलाबराव पाटील हे सत्तेत नसताना शेतक:यांसाठी शिंगाडा मोर्चा काढत होते. आता सत्तेत आल्यावर, मंत्रीपद मिळल्यावर गप्प का झाले? असा सवाल उपस्थित करीत मतदार संघात अवैध धंद्यांच्या जिवावर राजकारण करीत असल्याचा आरोप केला. मतदार संघातील सट्टा,पत्ता, दारू  15 दिवसात बंद न झाल्यास त्यांना मतदार संघात फिरू देणार नाही, असा इशाराही त्यांनी  दिला.
रणरणत्या उन्हात शेतकरी संघर्ष मोच्र्यात  शेतकरी मोठय़ा संख्येने सहभागी झाले होते.  भाजपा- शिवसेना सरकार शेतक:यांच्या विरोधातील सरकार असल्याचा आरोप या वेळी करण्यात आला.
सहकार राज्यमंत्री गुलाबराव पाटील यांनी दारू, सट्टा, पत्ता अशा अवैध धंद्यांना जोपासून पिढी बरबाद केल्याचा आरोप गुलाबराव देवकर यांनी केला.
 

Web Title: Dharanggaon Historical Front for Farmer's Charter

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.