पिलखोड उपखेड नदीपात्रात वाळूमाफियांचा धिंगाणा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 5, 2021 04:11 AM2021-07-05T04:11:53+5:302021-07-05T04:11:53+5:30
पिलखोड, ता. चाळीसगाव : गेल्या अनेक दिवसापासून पिलखोड व उपखेड नदीपात्रातून चाळीसगाव महसूल विभाग व मेहुणबारा पोलीस स्टेशन यांच्या ...
पिलखोड, ता. चाळीसगाव : गेल्या अनेक दिवसापासून पिलखोड व उपखेड नदीपात्रातून चाळीसगाव महसूल विभाग व मेहुणबारा पोलीस स्टेशन यांच्या क्षेत्रात नदीपात्रातून बैलगाडीमार्फत प्रचंड प्रमाणात वाळू उपसा केला जात आहे..
सकाळी ७ वाजेपासून रात्री १ वाजेपर्यंत बैलगाड्यामार्फत वाळूची सर्रास चोरी होत आहे. हे वाळूमाफिया उपखेड, सेवानगर, मालेगाव रोड, देशमुख वाडी रोड याठिकाणी बैलगाडीमार्फत वाळू जमा करून ४०७ व पिकअप या वाहनांद्वारे ८ ते १२ हजाराद्वारे वाळू विकली जाते. या गंभीर घटनेत जिल्हाधिकारी, प्रांत व तहसीलदार यांनी तातडीने लक्ष घालून या वाळूमाफियांचा बंदोबस्त करावा, अशी मागणी शेतकरी व ग्रामस्थांनी केली आहे.
उपखेड पिलखोड मंदुर्णे या गावाच्या पाणीपुरवठा करणाऱ्या विहिरी नदीपात्राला लागून आहेत. असा वाळूचा उपसा चालू राहिल्यास सिंचन होणार नाही व भविष्यात मोठी समस्या निर्माण होईल, असे म्हटले जात आहे.