जलसंपदा मंत्र्याच्याहस्ते ‘ढोल बाजे..’, सोमेश्वर महादेव मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळ्य़ात वाजविला ढोल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 3, 2018 01:18 PM2018-02-03T13:18:04+5:302018-02-03T13:22:53+5:30
सोमेश्वर महादेव मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळ्य़ास उत्साहात सुरुवात
ऑनलाईन लोकमत
जामनेर, जळगाव, दि. 3- सोनबर्डी येथील सोमेश्वर महादेव मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळ्य़ास सुरुवात झाल्यानंतर काढण्यात आलेल्या शोभायात्रेत जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांनीदेखील ढोल वाजविला.
सोनबर्डी येथील सोमेश्वर महादेव मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळ्य़ास शनिवारी सकाळी सुरुवात झाली. या निमित्त जामनेर शहरातून शनिवारी सकाळी भव्य कलश यात्रा काढण्यात आली. यामध्ये परिसरातील सुमारे 30 हजार भाविक सहभागी झाले होते.
सकाळी दहा वाजता पालिका चौकातून कलश यात्रेला सुरुवात झाली. भजनी मंडळ, पारंपारिक वेशभुषा केलेले शालेय विद्यार्थी, सजविलेल्या बग्गीवर बसलेले साधू महंत व कलषधारी महिलांसह मोठय़ा संख्येने नागरिक यात सहभागी झाले होते. यात्रेचे रस्त्याच्या दुतर्फा थांबलेले भाविक यात चौका चौकात सहभागी होत असल्याने सोनबर्डीकडे जाणारा रस्ता भाविकांनी फुलला होता.
सोनबर्डी येथे जलसंपदा मंत्री गिरीष महाजन व नगराध्यक्षा साधना महाजन यांच्याहस्ते सोमेश्वर मंदिरात पूजा करण्यात आली.
जिल्ह्यातील बहतांश आमदारांनी यावेळी हजेरी लावली. कलश यात्रेतील भाविकांसाठी ठिकठिकाणी सरबत व थंड पाण्याची व्यवस्था करण्यात आली होती. कलश यात्रेतील भाविक प्रभू श्रीरामांचा जयघोष करीत होते. भगवे फेटे परिधान केलेले युवक व महिला कलश यात्रेत लक्ष वेधून घेत होते.