रुग्णालयात उपचारासाठी दाखल बंद्याने ठोकली धूम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 27, 2021 04:17 AM2021-04-27T04:17:45+5:302021-04-27T04:17:45+5:30
जळगाव : श्वासोच्छ्वासाचे कारण सांगून डॉ.उल्हास पाटील रुग्णालयात दाखल झालेल्या जोसेफ राजू अब्राम्ह याने पोलिसांची नजर चुकवून पलायन केल्याची ...
जळगाव : श्वासोच्छ्वासाचे कारण सांगून डॉ.उल्हास पाटील रुग्णालयात दाखल झालेल्या जोसेफ राजू अब्राम्ह याने पोलिसांची नजर चुकवून पलायन केल्याची घटना उघडकीस आली आहे. शेजारीच ऊसाच्या शेतात लपलेल्या जोसेफ याला पकडण्यात पोलिसांना यश आले. २१ एप्रिल रोजी पहाटे साडे पाच वाजता घडली. याप्रकरणी नशिराबाद पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सूत्रांकडून मिळालेली माहिती अशी की, २० एप्रिल रोजी कैदी जोसेफ अब्राम्ह याला उपचारासाठी जळगाव -भुसावळ रोडवरील डॉ. उल्हास पाटील रुग्णालयात दाखल करण्यात आले होत. अब्राम्ह याची कोरोनाची चाचणीही करण्यात आली होती. ती निगेटीव्ह आली होती. मात्र कैद्याला श्वास घेण्यास त्रास होत असल्याने डॉक्टरांनी त्यास रुग्णालयातील आपातकालीन विभागात उपचारासाठी दाखल केले होते. याठिकाणी पोलीस मुख्यालयाचे पोलीस कॉन्स्टेबल जितेंद्र रोहिदास पांडव तसेच पोलीस कॉन्स्टेबल विनोद सोनवणे यांची ड्युटी होती. दरम्यान २१ एप्रिल रोजी पहाटे साडेपाच वाजेच्या सुमारास कर्मचारी वार्डात गेले असता जोसेफ बेडवर नव्हता. तो पळून गेल्याची खात्री झाल्यावर ही बाब पोलीस मुख्यालय तसेच नशिराबाद पोलिसांना कळविण्यात आली. घटनेची माहिती मिळाल्यावर नशिराबाद पोलीस ठाण्याच अधिकारी तसेच कर्मचार्यांनी रुग्णालय गाठले. पळून गेलेल्या बंद्याचा शोध सुरु केला. पोलिसांच्या ताफ्याने रुग्णालयाच्या परिसरातील शेतांमध्ये त्याचा शोध घेतला. यादरम्यान एका ऊसाच्या शेतात अब्राम्ह हा लपलेला होता. त्यास पोलिसांनी ताब्यात घेत अटक केली. त्याच्या विरोधात पोलीस कॉन्स्टेबल जितेंद्र रोहिदास पांडव यांच्या फिर्यादीवरुन नशिराबाद पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.