लोहारा आरोग्य केंद्रातर्फे अतिसार नियंत्रण पंधरवडा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 17, 2021 04:13 AM2021-07-17T04:13:37+5:302021-07-17T04:13:37+5:30
लोहारा, ता. पाचोरा : येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात अतिसार नियंत्रण पंधरवडा आयोजित केला आहे. या मोहिमेचे उद्घाटन १५ ...
लोहारा, ता. पाचोरा : येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात अतिसार नियंत्रण पंधरवडा आयोजित केला आहे.
या मोहिमेचे उद्घाटन १५ रोजी जिल्हा परिषद सदस्य रेखा राजपूत व जि. प. चे माजी सदस्य दीपकसिंग राजपूत यांच्या उपस्थितीत करण्यात आले.
या अतिसार नियंत्रण पंधरवडा योजनेत प्रत्येक घरातील शून्य ते पाच वर्षे वयोगटातील मुलांना ओआरएस व टॅबलेट झिंगचे वाटप आशा स्वयंसेविकांमार्फत करण्यात येणार आहे. तसेच नियमित लसीकरणामध्ये दीड महिन्याच्या बालकांना डोस देण्यात येणार आहे, अशी माहिती वैद्यकीय अधिकारी डॉ. चंद्रशेखर पाटील यांनी. दिली.
याच कार्यक्रमात येथील प्राथमिक आरोग्य केंद्रासाठी नव्याने प्राप्त झालेल्या रुग्णवाहिकेचे लोकार्पणदेखील करण्यात आले. या कार्यक्रमास लोहारा सरपंच अक्षय जैस्वाल, शेतकरी सेना जिल्हाप्रमुख अरुण पाटील, शिवसेना गटप्रमुख दिनकर गिते, ग्रा. पं. सदस्य ईश्वर देशमुख, सुरेश चौधरी, हिरालाल जाधव, सुरेश मोरे, सुरेश भिल, अशोक जैन, नंदू राजपूत, रामराज्यचे अध्यक्ष संतोष कोळी, दिलीप गायकवाड, विलास बाजीराव, भास्कर अंबीकार, संदीप पाटील, संदीप गायकवाड, वैद्यकीय अधिकारी डॉ. देवेंद्र पाटील, वैद्यकीय अधिकारी डॉ. प्राची पाटील, प्रदीप खोडके, कैलास देशमुख, नीलेश शेळके व प्राथमिक आरोग्य केंद्राचे कर्मचारी उपस्थित होते.