"संधी होती तेव्हा घरातून बाहेर पाय काढला नाही, आता नाटकं कशाला?’’ गिरीश महाजनांचा उद्धव ठाकरेंना टोला
By ऑनलाइन लोकमत | Published: October 25, 2022 12:41 AM2022-10-25T00:41:59+5:302022-10-25T00:44:45+5:30
Girish Mahajan's Criticize Uddhav Thackeray: राज्याचे ग्रामविकास मंत्री आणि भाजपा नेते गिरीश महाजनांची उद्धव ठाकरेंवर सडकून टीका केली आहे. तसेच हा दौरा म्हणजे उद्धव ठाकरेंचा नाटकीपणा, असल्याचा टोला गिरीश महाजन यांनी लगावल आहे.
जळगाव - राज्याचे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी अतिवृष्टी झालेल्या भागांचा दौरा करून शेतकऱ्यांची विचारपूस केल्यानंतर या दौऱ्यावरून आरोप प्रत्यासोर सुरू झालेले आहेत. आता राज्याचे ग्रामविकास मंत्री आणि भाजपा नेते गिरीश महाजनांचीउद्धव ठाकरेंवर सडकून टीका केली आहे. तसेच हा दौरा म्हणजे उद्धव ठाकरेंचा नाटकीपणा, असल्याचा टोला गिरीश महाजन यांनी लगावल आहे.
गिरीश महाजन म्हणाले की, उद्धव ठाकरे यांनी संधी होती तेव्हा घरातून बाहेर पाय काढला नाही, आता नाटकं कशाला? उद्धव ठाकरे यांचा दौरा म्हणजे साप निघून गेल्यावर जमिनीवर काठी आदळण्याचा प्रकार होय, असा चिमटा गिरीश महाजन यांनी यावेळी काढला.
दरम्यान, राज्य सरकारमधील ग्रामविकास मंत्री गिरीश महाजनांनी कुटुंबीयांसोबत दिवाळी साजरी केली. जामनेर येथे राहत्या घरी पत्नी, मुलगी जावई आणि नातवंडांसोबत गिरीश महाजन यांनी लक्ष्मीपूजन साजरं केलं. कोरोनानंतर दिवाळीचा सण मोठ्या उत्साहात साजरा होतोय, त्यामुळं यावर्षीच्या दिवाळी एक वेगळं महत्त्व आहे.दिवाळी निमित्ताने कुटुंबासोबत एकत्र जमता येतं, त्याचा विशेष आनंद असल्याचे गिरीश महाजन म्हणाले.