जीएसटी दरात फरक, किमतीत नाही
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 19, 2021 04:17 AM2021-09-19T04:17:33+5:302021-09-19T04:17:33+5:30
आज कोणतीही औषधे घ्यायला गेल्यास त्याच्या किमती मोठ्या प्रमाणात वाढल्या असून, आर्थिक भार वाढला आहे. औषधांवरील जीएसटी हटवून ती ...
आज कोणतीही औषधे घ्यायला गेल्यास त्याच्या किमती मोठ्या प्रमाणात वाढल्या असून, आर्थिक भार वाढला आहे. औषधांवरील जीएसटी हटवून ती स्वस्त होण्यासाठी प्रयत्न करणे गरजेचे आहे. काही औषधांवरील जीएसटी कमी करणार असल्याचे जाहीर केले असले, तरी भार तर राहणारच आहे.
- रामेश्वर सोळंके, ग्राहक
जीएसटी कमी करण्याचे केवळ गाजर दाखवले जात आहे. औषधे स्वस्त होण्यासाठी पूर्णपणे जीएसटी हटवला पाहिजे. पाच टक्के जीएसटी ठेवला तरी किमती अधिक राहू शकतात. त्यामुळे औषधे जीएसटीमुक्त करावीत. आता औषधे किती स्वस्त होतील, याची उत्सुकता आहे.
- दिलीप जाधव, ग्राहक.
काय म्हणतात व्यावसायिक
कर्करोगाच्या औषधांवरील जीएसटी पाच टक्के केला असला, तरी औषधांच्या किमती फारशा कमी होणार नाहीत. औषधांच्या किमती कमी करायच्या असतील तर त्यावरील जीएसटी पूर्णपणे हटवला पाहिजे. यासाठी संघटनेकडून पाठपुरावा सुरू आहे.
- सुनील भंगाळे, अध्यक्ष, डिस्ट्रीक्ट मेडिसीन डिलर असोसिएशन.
मालवाहतुकीच्या वाहनांवरील राष्ट्रीय परवाना शुल्कावरील जीएसटीत सूट देण्याचे सांगण्यात आले असले, तरी त्याचा मालवाहतूकदारांना काहीही लाभ होणार नाही. तसेच यामुळे मालभाडेही कमी होणार नाही.
- पप्पू बग्गा, अध्यक्ष, जळगाव जिल्हा ट्रान्सपोर्ट असोसिएशन.