एरंडोल येथे मुख्यमंत्र्यांच्या वाढदिवसानिमित्त शिवसेनेच्या दोन गटांचे वेगवेगळे कार्यक्रम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 29, 2021 04:18 AM2021-07-29T04:18:31+5:302021-07-29T04:18:31+5:30

आमदारांनी केले विकास कामांचे भूमिपूजन : नूतन जिल्हाध्यक्ष डॉ.हर्षल माने यांनी वाटप केल्या छत्र्या एरंडोल : मुख्यमंत्री ...

Different programs of two groups of Shiv Sena on the occasion of Chief Minister's birthday at Erandol | एरंडोल येथे मुख्यमंत्र्यांच्या वाढदिवसानिमित्त शिवसेनेच्या दोन गटांचे वेगवेगळे कार्यक्रम

एरंडोल येथे मुख्यमंत्र्यांच्या वाढदिवसानिमित्त शिवसेनेच्या दोन गटांचे वेगवेगळे कार्यक्रम

Next

आमदारांनी केले विकास कामांचे भूमिपूजन : नूतन जिल्हाध्यक्ष डॉ.हर्षल माने यांनी वाटप केल्या छत्र्या

एरंडोल : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून आमदार चिमणराव पाटील यांच्या निधीतून विकास कामांचे भूमिपूजन करण्यात आले. तर नवे जिल्हाप्रमुख डॉ. हर्षल माने यांनी छत्र्यांचे वाटप केले. यामुळे शिवसेनेतील मतभेद पुन्हा एकदा समोर आले आहेत.

एरंडोल शहरातील गांधीपुरा, विखरण रोड परिसर व म्हसावद रोडवरील नवीन वसाहतींमध्ये विकास कामांचा शुभारंभ आमदारांनी केला त्यावेळी त्यांनी पक्षातील विरोधकांवर शरसंधान केले. गेल्या ४०वर्षात आपण सर्व संकटांवर मात करून पुढे जात असल्याचा टोला लगावला. याप्रसंगी पारोळा बाजार समितीचे सभापती अमोल पाटील, शिवसेनेच्या महिला आघाडी जिल्हाप्रमुख महानंदा पाटील, माजी नगराध्यक्ष किशोर निंबाळकर, माजी नगराध्यक्ष राजेंद्र चौधरी, जिल्हा परिषद उपाध्यक्ष ज्ञानेश्वर आमले, माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष हिम्मत पाटील, तालुकाप्रमुख वासुदेव पाटील, जि.प.सदस्य नानाभाऊ महाजन, बाजार समितीचे माजी सभापती शालिग्राम गायकवाड आदी उपस्थित होते.

दुसऱ्या एका कार्यक्रमात एरंडोल येथील शिवसेना कार्यालयात विधानसभा क्षेत्र प्रमुख जगदीश पाटिल यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हाप्रमुख डॉ. हर्षल माने यांच्यातर्फे छत्री वाटपचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यावेळी जिल्हाप्रमुख हर्षल माने यानी मनोगत व्यक्त केले.या वेळी कार्यक्रमामध्ये विधानसभा क्षेत्र प्रमुख जगदीश पाटील, उप तालुका प्रमुख रवींद्र चौधरी, उमर्दे येथील उपसरपंच संदीप पाटिल, रवींद्र जाधव, सुनील मानुधने, संजय महाजन, प्रसाद दंडवते, रूपेश माळी, अरुण महाजन,संदीप पाटिल, गजानान महाजन, गोपाल महाजन, महेश महाजन, भिका चौधरी, विनोद मराठे, युवासेना, शिवसेना,शाखा प्रमुख, गटप्रमुख मोठ्या संख्येने शिवसैनिक बांधव उपस्थित होते. सूत्रसंचालन प्रमोद महाजन यानी केले.

Web Title: Different programs of two groups of Shiv Sena on the occasion of Chief Minister's birthday at Erandol

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.