डिगंबर महाराज पायी वारीची 35 व्या वर्षाकडे वाटचाल
By admin | Published: June 11, 2017 03:43 PM2017-06-11T15:43:24+5:302017-06-11T15:43:24+5:30
रावेर - यावल तालुक्यातील हरीभक्तांची वारीत फुलते मांदियाळी
Next
पाहावा विठ्ठल..बोलावा विठ्ठल.. करावा विठ्ठल..अशी विठ्ठलमय आत्मानुभूती होणा:या हरिभक्त वैष्णवांचा मेळा चिनावल येथील वैकुंठवासी निष्ठावंत वारकरी गुरूवर्य हभप दिगंबर महाराज यांनी त्यांच्या हयातीत तालुक्यातील खानापूर येथून श्री क्षेत्र पंढरपूरला जाणा:या पायी दिंडी वारीची रोवलेली पताका अमृतमहोत्सवी वर्षाकडे त्रिभुवनी फडकत आहे.
श्री दिगंबर महाराज यांच्या वृध्दापकाळात खंडित झालेल्या या अमृतमहोत्सवी पायी वारीची पताका गत 35 वर्षांपासून त्यांचे अनुयायी हभप अरूण महाराज बोरखेडेकर यांनी खांद्यावर घेतली आहे. त्यांच्या नेतृत्वाखाली व दिंडीचालक हभप भगवंत महाराज (खानापूर) यांच्या मार्गदर्शनाखाली भक्तीरसातून परमानंदाची आत्मानुभूती देणा:या या पायी वारीची अव्याहत परंपरा कायम राखली आहे.
यावल व रावेर तालुक्यातील हरीभक्तांना वारीतून नेणा:या या वारीला चिनावल येथील वै.हभप दिगंबर महाराज यांच्या निष्ठावंत अखंडित पायी वारीचे अधिष्ठान लाभले आहे. दिगंबर महाराजांनी त्यांच्या हयातीत 35 ते 40 वर्षे वारी भक्तीची परंपरा चालवली होती . मध्यप्रदेश सीमावर्ती भागातील खानापूर येथून या पायी दिंडी वारीचे हभप दिगंबर महाराज वारकरी संस्थांनच्या ध्वजपताकेखाली गत 34 वर्षांपासून प्रस्थान होत आहे. 600 कि.मी. अंतरावर 23 मुक्कामातुन रोज 25 कि.मी. पायी अंतर कापत भावभक्तित तल्लीन होवून वाटचाल सुरू असते. खानापूरहून ज्येष्ठ शुध्द दशमीला या पायी दिंडी वारीचे प्रस्थान झाल्यानंतर पहिला मुक्काम चिनावल येथे श्री दिगंबर महाराजांच्या पुण्यभुमीत घेत ज्येष्ठ शु एकादशीला प्रस्थान होत असते. हंबर्डी, खडका, जामनेर, भारूडखेडा, गोळेगाव, सिल्लोड, भोकरदन, केदारखेडा, पांगरी, जालना, अंबड, शहागड, पाडळसिंगी, बीड, उदंडवडगाव, पारगाव, भूम, कोरेगाव, बार्शी, वडशिंगे, उपळाई व आष्टीचा शेवटचा मुक्काम घेवून आषाढ शु.चतुर्थीला हा पायी दिंडी सोहळा चंद्रभागेच्या तिरी नव्या सोलापूर रोडवरील श्री दिगंबर महाराज वारकरी संस्थांनतर्फे सुमारे चार कोटी रुपये खचरून उभारण्यात आलेल्या भव्य वारकरी निवासात विसावतो.
गायन-वादन कला संस्कृतीत नैपुण्य मिळवलेली तरूणाई कपाळी चंदनाचा टिळा लावून गळ्यात टाळ मृदंग व वीणा घेवून या दिंडीत सामील होत असल्याने या दिंडीला तारुण्य प्राप्त झाले आहे. संजीव महाराज (विटवे), अमोल भंजाले (रावेर), गोकुळ महाराज (विटवे), गोलू महाराज (पुनखेडा), उमेश महाराज (रसलपूर) किरण पाटील (धामणदे), अंबादास महाराज (मुक्ताईनगर), अप्पा महाराज (खानापूर) या तरूण टाळकरी, मृदंगाचार्य व गायकांसह 150 ते 200 वारक:यांचा समावेश असतो .
टाळ मृदंगाच्या गजरात रोज दरमजल सुमारे 25 कि.मी.अंतर भगवंताच्या नामस्मरणात प्राप्त होणा:या परमानंदातून पायी तुडवत पंढरपूरकडे वाटचाल करणा:या या दिंडीत रावेरसह यावल, ब:हाणपूर तालुक्यातील हरीभक्तांची मांदियाळी फुलत असते. श्री क्षेत्र पंढरपूर येथे पायी दिंडी वारीचे आगमन होताच वै.हभप डिगंबर महाराज वारकरी प्रशिक्षण संस्थेतील वारकरी व भजनी मंडळ चंद्रभागेच्या तीरावर स्वागतासाठी येतात. पायी दिंडी वारीतील वारक:यांची गळाभेट झाल्यानंतर दिंडी सोहळ्याने त्यांना वारकरी निवासात आणले जाते.