अवघ्या एकविसव्या वर्षी घेतली दिगंबर मुनी दीक्षा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 17, 2019 10:12 PM2019-08-17T22:12:26+5:302019-08-17T22:12:32+5:30
नेरी : गावाच्या शिरपेचात मानाचा तुरा !
नेरी ता.जामनेर (जि. जळगाव) : येथील मुळचे रहिवासी असलेले व सध्या औरंगाबाद स्थित असलेले रोहीत जैन (पाटणी) यांनी वयाच्या अवघ्या २१ व्या वर्षी दिगंबर मुनी दीक्षा घेतल्याने गावाच्या शिरपेचात एक मानाचा तुरा रोवला गेला आहे.
१५ आॅगस्ट रोजी राजस्थान येथील उदयपुर येथे आचार्य चंद्रसागर, आचार्य वैराग्यनंदी व आचार्य सुन्दरसागर यांच्या सान्निध्यात दीक्षा ग्रहणाचा कार्यक्रम संपन्न झाला औरंगाबाद येथे बारावी पर्यंतचे शिक्षण पूर्ण झाल्यानंतर धर्माची अत्यंत आवड असल्याने पुढील तीन वर्ष त्यांनी आचार्य कनकनंदी गुरुदेव यांच्या सहवासात राहून धार्मिक कार्याचे धडे घेतले. सर्व सुख सुविधांनी परिपूर्ण असलेले जीवन सोडून त्याग, तप, संयम या अत्यंत कठोर समजल्या जाणाऱ्या मार्गावर मार्गस्थ झाले. दिक्षेनंतर त्यांचे मुनी १०८ श्रीवत्सनंदी गुरुदेव असे नामकरण झाले.
१५ रोजी उदयपुर येथे झालेल्या तीन दिवशीय कार्यक्रमासाठी नेरी, जळगाव, औरंगाबाद, जालना, लासुर, चाळीसगाव, श्रीरामपुर, पुणे, उदयपुर, जयपुर तसेच देशभरातून अनेक श्रावक, समाज बांधव उपस्थित होते
रोहित जैन हे नेरी बुद्रुक ता.जामनेर येथील रहिवाशी असलेले स्व. ताराचंद जैन यांचे नातू तर व्यवसायानिमित्त सध्या औरंगाबाद येथे स्थायिक झालेले चंद्रशेखर (पप्पू) जैन यांचे ते सुपुत्र तर येथील आडत व्यापारी प्रेमचंद जैन व दीपचंद जैन यांच्या मोठ्या बंधुचे ते नातू आहेत.