पालकमंत्र्यांसह मान्यवरांनी केले शिवाजी महाराजांना वंदन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 20, 2021 04:45 AM2021-02-20T04:45:40+5:302021-02-20T04:45:40+5:30
यावेळी आमदार सुरेश भोळे, महापौर भारती सोनवणे, जिल्हाधिकारी अभिजित राऊत, माजी आमदार चंद्रकांत सोनवणे, नगरसेवक कैलास सोनवणे, शिवसेना महानगरप्रमुख ...
यावेळी आमदार सुरेश भोळे, महापौर भारती सोनवणे, जिल्हाधिकारी अभिजित राऊत, माजी आमदार चंद्रकांत सोनवणे, नगरसेवक कैलास सोनवणे, शिवसेना महानगरप्रमुख शरद तायडे, शंभू पाटील, मुकुंद सपकाळे, गनी मेनन आदींची उपस्थिती होती. पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण केला. यंदा शिवजयंती मोठ्या उत्साहात साजरी होईल, असे वाटत असताना कोरोनाचे रुग्ण वाढले. शिवाजी महाराजांचे पुतळे जेथे आहेत, तेथे वंदन कराच. मात्र गर्दी करू नका, नियम पाळा, असे आवाहन पालकमंत्र्यांनी यावेळी केले.
दुचाकींवर झेंडे
शिवजयंतीनिमित्त तरुणांनी काही प्रमाणात कोरोनाचे नियम पाळून दुचाकी रॅली काढून शिवाजी महाराजांचा जयघोष केला. शहरातील विविध भागातून दुचाकींवर शिवाजी महाराजांच्या प्रतिमेचे झेंडे लावून रॅली काढण्यात आली.
रिधूर येथे शिवजयंती साजरी
रिधूर येथे शिवाजी महाराज जयंती साजरी करण्यात आली. या प्रसंगी सरपंच ज्योती कोळी, उपसरपंच चुडामण पाटील, सदस्य सुरेश सोनवणे, निर्मला पाटील, रूपाली कोळी, वर्षा सोनवणे, राहुल कोळी, ग्रामसेविका स्वाती पाटील, पोलीस पाटील प्रमोद पाटील, अंगणवाडी सेविका मंगला पाटील, मदतनीस इंदिरा जगताप, गोपाळ कोळी, सागर कोळी हे उपस्थित होते.
नूतन मराठा महाविद्यालय
नूतन मराठा महाविद्यालयाचे प्राचार्य व क.ब.चौ. उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाचे व्यवस्थापन परिषद सदस्य डॉ.एल.पी. देशमुख यांच्या हस्ते शिवाजी महाराजांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यात आले. नाट्यशास्त्र विभागाच्या वतीने विद्यार्थ्यांनी शिवाजी महाराजांचा पोवाडा सादर केला. त्यानंतर ऑनलाईइन व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले. त्यात प्रा. लीलाधर पाटील यांनी 'शिवाजी महाराज एक युगपुरुष 'या विषयावर व्याख्यान दिले. फोटो २० सीटीआर ३७
बहिणाबाई विद्यालय
बहिणाबाई ज्ञानविकास संस्था संचलित प्राथमिक व माध्यमिक विद्यालयात छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. अध्यक्षस्थानी संस्थेचे अध्यक्ष बंडू काळे होते. सचिव जनार्दन रोटे यांची प्रमुख उपस्थिती होती. मुख्याध्यापक टी.एस. चौधरी, प्राथमिकचे मुख्याध्यापक राम महाजन आदींनी शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेस पुष्पाहार अर्पण केला. ज्येष्ठ शिक्षिका प्रतिभा खडके, डॉ. प्रतिभा राणे, सीमा चौधरी, स्वाती कोल्हे, डॉ. विलास नारखेडे, संतोष पाटील, राजेश वाणी, विशाल पाटील, दिनेश चौधरी, चंद्रकात पाटील, पद्माकर चौधरी, शंकर चव्हाण आदी उपस्थित होते.