ट्रकने धडक दिल्याने डिङोल टँंकरला गळती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 29, 2017 11:52 PM2017-03-29T23:52:46+5:302017-03-29T23:52:46+5:30
पारोळा : 10 हजार लीटर डिङोलची नासाडी, महामार्गावर अनेक दुचाकीस्वार घसरले
पारोळा : डिङोल टॅँकरला मागून येणा:या ट्रकने धडक दिल्याने, टॅँकरचा लॉक लीक होत महामार्गावर डिङोलचा सडा पडला. महामार्गावर डिङोल पडल्याने, अनेक दुचाकी घसरल्या, तर अनेकांनी डिङोल नेण्यासाठी गर्दी केली होती.
बुधवारी सायंकाळी 6.45 वाजेच्या सुमारास धुळ्याकडून पारोळ्याकडे येणा:या डिङोल टॅँकरला (क्र.एमएच 28-बी 8833) मागून येणा:या ट्रकने (एमएच 20-डब्ल्यू 5440) विचखेडा गावानजीक जोरदार धडक दिली. यात डिङोल टॅँकरचा लॉक तुटला. त्यामुळे टॅँकरमधून महामार्गावर डिङोल गळती सुरू झाली. महामार्गावर डिङोलचा सडाच पडला होता. विचखेडा ते पारोळ्यातील किसान महाविद्यालयार्पयत रस्त्यावर डिङोल सांडत होते. हा प्रकार पोलीस कॉन्स्टेबल सुनील साळुंखे, पवार यांच्या लक्षात आला. त्यांनी तो टॅँकर दुर्गा पेट्रोल पंपाजवळ थांबवून तो एका सुरक्षितस्थळी लावण्यात आला. दरम्यान टॅँकरमधून डिङोलची गळती होत असल्याचे समजल्यावर काही नागरिकांनी डिङोल ङोलण्यासाठी बादली, बाटली घेत टॅँकरच्या मागे धावत असल्याचे चित्र होते. जवळपास 10 हजार लिटर्स डिङोलची नासाडी झाल्याचे सांगण्यात येत आहे.
रस्त्यावर डिङोल पडले असल्याचे अंधारात समजले नाही. त्यामुळे महामार्गावर काहींच्या दुचाकी घसरल्या होत्या. (वार्ताहर)