कृउबा सभापतीपदी दिनकर देशमुख

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 30, 2021 04:11 AM2021-06-30T04:11:05+5:302021-06-30T04:11:05+5:30

: येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापतीपदी अडावद येथील दिनकर देशमुख यांची बिनविरोध निवड करण्यात आली. मागील हप्त्यात कांतीलाल ...

Dinkar Deshmukh as Kruba Speaker | कृउबा सभापतीपदी दिनकर देशमुख

कृउबा सभापतीपदी दिनकर देशमुख

Next

: येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापतीपदी अडावद येथील दिनकर देशमुख यांची बिनविरोध निवड करण्यात आली.

मागील हप्त्यात कांतीलाल पाटील यांनी खासगी करारानुसार सभापतीपदाचा राजीनामा दिला होता. म्हणून रिक्त झालेल्या जागेसाठी २९ रोजी सकाळी १०.३० ते १२.०० या कालावधीत निवडणूक प्रक्रिया पार पडली. निवडणूक निर्णय अधिकारी तथा सहायक उपनिबंधक के. पी. पाटील यांच्या अध्यक्षतेखाली निवडणूक प्रक्रिया पार पडली. सभापतीपदासाठी दिनकर देशमुख यांचा एकमेव अर्ज आल्याने त्यांची सभापती म्हणून बिनविरोध निवड करण्यात आली. यावेळी उपसभापती नंदलाल भानुदास पाटील, संचालक जगन्नाथ दामू पाटील, कांतीलाल गणपत पाटील, भरत पाटील यांच्यासह इतर सर्व संचालक हजर होते. सचिव एन. आर. सोनवणे, जितेंद्र पाटील यांनी सहकार्य केले. दिनकर देशमुख यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.

फोटो ३०सीडीजे २

Web Title: Dinkar Deshmukh as Kruba Speaker

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.