ध्वनिप्रदूषण केल्यास आता थेट कारवाई

By Admin | Published: July 24, 2015 08:08 PM2015-07-24T20:08:17+5:302015-07-24T20:08:17+5:30

ध्वनिप्रदूषण केल्यास आता थेट कारवाईला सामोरे जावे लागणार आहे. त्यासाठी प्रत्येक पोलीस ठाण्यात ध्वनिप्रदूषण नियंत्रण अधिकार्‍यांची नेमणूक करण्यात आली आहे.

Direct action should now be taken against noise pollution | ध्वनिप्रदूषण केल्यास आता थेट कारवाई

ध्वनिप्रदूषण केल्यास आता थेट कारवाई

googlenewsNext

 नंदुरबार : ध्वनिप्रदूषण केल्यास आता थेट कारवाईला सामोरे जावे लागणार आहे. त्यासाठी प्रत्येक पोलीस ठाण्यात ध्वनिप्रदूषण नियंत्रण अधिकार्‍यांची नेमणूक करण्यात आली आहे. 
सण, उत्सव तसेच खासगी कार्यक्रमानिमित्त ध्वनिप्रदूषण मोठय़ा प्रमाणावर होते. याबाबत मुंबई उच्च न्यायालयाने काही निर्देश दिले आहेत. त्यानुसार आता जिल्ह्यातील सर्व पोलीस ठाण्यांकरिता ध्वनिप्रदूषण नियंत्रण अधिकारी म्हणून पोलीस ठाणे प्रभारी अधिकारी यांना प्राधिकृत केले आहे. त्यांची नावे, पत्ता व दूरध्वनी क्रमांकाची माहिती नागरिकांना व्हावी यासाठी नगरपालिका, पंचायत समिती, ग्रामपंचायतींमध्ये लावण्यात आली आहे. शिवाय जिल्ह्याच्या अधिकृत संकेत स्थळावरदेखील उपलब्ध करून देण्यात आली आहे.
नियुक्त केलेल्या अधिकार्‍यांमध्ये नंदुरबार शहरसाठी पोलीस निरीक्षक अनिल कटके, तालुक्यासाठी निरीक्षक के.जी. पवार, उपनगरसाठी निरीक्षक प्रदीप खंडू ठाकूर, शहाद्यासाठी निरीक्षक संजय महाजन, सारंगखेड्यासाठी विनोद पाटील, म्हसावदसाठी सुनील खरे, धडगावसाठी दीपक बुधवंत, मोलगीसाठी गोरक्ष पालवे, तळोद्यासाठी सतीश भामरे, अक्कलकुव्यासाठी प्रल्हाद घाटे, नवापूरसाठी रामदास पाटील, विसरवाडीसाठी जितेंद्र सपकाळे यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

Web Title: Direct action should now be taken against noise pollution

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.