कृषिमंत्र्यांशी ‘सरळ लढा’ आवश्यक
By admin | Published: September 14, 2015 12:46 AM2015-09-14T00:46:14+5:302015-09-14T00:46:14+5:30
धुळे : राहुरी कृषी विद्यापीठाचे विभाजन करून निर्माण होणारे नवीन विद्यापीठ धुळ्यात व्हावे यासाठी कृषिमंत्री एकनाथराव खडसेंशी सरळ लढा द्यावाच लागेल, असा सूर याप्रश्नी झालेल्या बैठकीत उमटला़
धुळे : राहुरी कृषी विद्यापीठाचे विभाजन करून निर्माण होणारे नवीन विद्यापीठ धुळ्यात व्हावे यासाठी कृषिमंत्री एकनाथराव खडसेंशी सरळ लढा द्यावाच लागेल, असा सूर याप्रश्नी झालेल्या बैठकीत उमटला़ केवळ निवेदने देत राहिलो, तर विद्यापीठाच्या घोषणेनंतर पश्चात्तापाची वेळ येऊ शकते, त्यामुळे विद्यापीठ धुळ्यात व्हावे यासाठी ग्रामीण भागातील जनता, सर्व समविचारी संघटना व विद्यार्थी संघटनांना सोबत घेण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय या वेळी घेण्यात आला़ नवीन कृषी विद्यापीठ धुळ्यात व्हावे यासाठी आंदोलनाच्या रिंगणात उतरलेल्या परिवर्तन महासंघाची बैठक रविवारी मराठा सेवा संघाच्या मालोजीराव भोसले सभागृहात झाली़ या वेळी माजी आमदार प्रा़शरद पाटील, जयहिंद संस्थेचे संचालक अॅड़ आय़जी़ पाटील, अंधश्रद्धा निमरूलन समितीचे राज्य कार्याध्यक्ष अविनाश पाटील, सत्यजित सिसोदे, मराठा सेवा संघाचे डॉ़ संजय पाटील, साहेबराव देसाई, मूलनिवासी संघाचे राहुल वाघ, चंद्रवीर सावळे, अनिल पाटील, डॉ़सुदाम राठोड, ज्येष्ठ नागरिक संघाचे व्ही़ज़े पाटील यांच्यासह विविध मान्यवर उपस्थित होत़े कृषी विद्यापीठ धुळ्यात व्हावे यासाठी केवळ निवेदन देऊन चालणार नाही, तर संघर्ष करावा लागेल़ जर वेळीच योग्य व कठोर भुमिका घेतली नाही, तर उमविप्रमाणेच कृषी विद्यापीठही पळविले जाऊ शकत़े त्यामुळे तालुका स्तरावर बैठका, ग्रामीण भागातील जनता, शेतकरीवर्ग, विद्यार्थी संघटना यांना या आंदोलनाशी जोडण्यासाठी प्रयत्न केला जाणार आह़े या वेळी माजी आमदार शरद पाटील म्हणाले की, खडसे यांनी विद्यापीठाला चार हजार हेक्टर जमीन लागते असे सांगून जिल्ह्यातील नागरिकांची दिशाभूल केली आह़े कृषी क्षेत्रातील मान्यवरांनी दिलेल्या माहितीनुसार एक हजार एकर क्षेत्रात विद्यापीठ होऊ शकत़े बैठकीत अनेक मान्यवरांनी मनोगत व्यक्त करून या आंदोलनास बळ देण्यासाठी पुढे येण्याचे आवाहन केल़े