धुळे रोडवरचे दिशादर्शक फलक दिशाभूल करणारे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 10, 2021 04:12 AM2021-07-10T04:12:21+5:302021-07-10T04:12:21+5:30

अमळनेर : धुळे रस्त्यावर अमळनेर शहराच्या प्रवेशद्वाराचे काम सुरू असून, याठिकाणी अनेक अपघात झाल्याने पोलिसांनी दृष्टीस पडणारे व मार्ग ...

Directional signs on Dhule Road are misleading | धुळे रोडवरचे दिशादर्शक फलक दिशाभूल करणारे

धुळे रोडवरचे दिशादर्शक फलक दिशाभूल करणारे

Next

अमळनेर : धुळे रस्त्यावर अमळनेर शहराच्या प्रवेशद्वाराचे काम सुरू असून, याठिकाणी अनेक अपघात झाल्याने पोलिसांनी दृष्टीस पडणारे व मार्ग दाखवणारे फलक लावण्याच्या सूचना बांधकाम विभागाला दिल्या होत्या, मात्र दोन्ही दिशेला बाण दाखवणारे फलक नेमके गोंधळात टाकणारे असून, अपघाताला आमंत्रण देणारे आहेत. धुळे रोडवर प्रवेशद्वाराचे काम चालू असून, एकाच बाजूने वाहतूक सुरू होती. मात्र रात्री वाहनचालकांना याबाबत काहीच बोध होत नसल्याने किमान आठ ते दहा अपघात झाले आहेत. त्यामुळे वळण मार्ग व्यवस्थित करावा आणि दिशादर्शक फलक रात्री वाहनचालकांना दिसतील अशा स्थितीत लावावेत अशी ताकीद पोलीस विभागातर्फे सार्वजनिक बांधकाम विभागाला देण्यात आले होते. बांधकाम विभागाचे अभियंते या कामाकडे दुर्लक्ष करीत असल्याने ठेकेदार बेजबाबदार झाला आहे. नुकतेच पोलीस निरीक्षक जयपाल हिरे यांनी जनतेच्या सुरक्षेसाठी हस्तक्षेप करून पत्र दिले. त्यांनतर ठेकेदाराने उजव्या बाजूने डायवर्शन कच्चा रस्ता पुन्हा तयार केला मात्र सूचना फलक दोन लावले आहेत. त्यात एक सावधान काम चालू आहे असे लिहून रस्ता डाव्या बाजूने जात असल्याचा बाण दाखविला आहे, तर दुसरा साधा डिजिटल फलक लावून उजव्या बाजूला बाण दाखविला आहे. डाव्या बाजूने रस्ता नसल्याने १०० टक्के वाहनचालक गोंधळात पडून अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही. ठेकेदाराचा वेंधळेपणा आणि अभियंत्यांचा बेजाबदारपणा प्रवाशांना घातक ठरत आहे. त्यामुळे चूक सुधारून अनेक महिन्यांपासून प्रलंबित काम तत्काळ पूर्ण करावे, अशी मागणी होत आहे.

रस्त्याच्या दोन्ही दिशेला बाण दाखविणारे दोन वेगवेगळे फलक छाया अंबिका. फोटो १०/८

Web Title: Directional signs on Dhule Road are misleading

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.