जळगाव जिल्ह्यातील ११ जणांना पोलिस महासंचालक पदक
By विलास बारी | Updated: April 25, 2024 22:55 IST2024-04-25T22:54:14+5:302024-04-25T22:55:12+5:30
राज्य शासनाच्या गृह विभागाने या पदकांची घोषणा केली.

जळगाव जिल्ह्यातील ११ जणांना पोलिस महासंचालक पदक
विलास बारी, लोकमत न्यूज नेटवर्क, जळगाव :पोलिस विभागात काम करीत असताना उत्तम कामगिरी केल्याबद्दल पोलिस महासंचालक रश्मी शुक्ला यांनी राज्यातील पोलिस अधिकारी व कर्मचाऱ्यांना पोलिस महासंचालक सन्मानचिन्हाची घोषणा केली आहे. त्यात जळगाव जिल्ह्यातील ११ जणांचा समावेश आहे.
राज्य शासनाच्या गृह विभागाने गुरुवार दि.२५ रोजी या पदकांची घोषणा केली. त्यात जळगाव पोलिस दलातील संजय नारायण हिवरकर, मीनल श्रीकांत साकळीकर, राजेश पंडित पाटील, दीपक देवराम चौधरी, विजय नामदेव सोनवणे, प्रवीणा गजानन जाधव, महेश अरविंद बागुल, मोहम्मदअली सत्तारअली सैयद, शकिल अहमद शब्बीर शेख, संजय राजाराम पाटील, राजेश शाहू पाटील यांचा समावेश आहे.