विद्यापीठात दिव्यांग विद्यार्थी संवाद कार्यशाळा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 2, 2019 08:35 PM2019-12-02T20:35:22+5:302019-12-02T20:35:32+5:30
जळगाव - कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या विद्यार्थी विकास विभागाच्यावतीने जागतिक दिव्यांग दिना निमित्त दिव्यांग विद्यार्थी संवाद कार्यशाळा ...
जळगाव- कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या विद्यार्थी विकास विभागाच्यावतीने जागतिक दिव्यांग दिना निमित्त दिव्यांग विद्यार्थी संवाद कार्यशाळा सकाळी १०.३० वाजता होत आहे.
अध्यक्षस्थानी कुलगुरु प्रा.पी.पी.पाटील हे असतील. यावेळी प्रा.सी.एस.पाटील (धरणगाव ) यांचे बहिणाबाईंच्या काव्यातील जीवनवाद यावर व्याख्यान होणार आहे. दिव्यांग विद्यार्थी सोयी-सुविधा-समावेशी शिक्षण या विषयावर डॉ.राम भावसार मार्गदर्शन करणार आहेत. प्रभारी वित्त व लेखा अधिकारी डॉ.विवेक काटदरे हे प्रेरणादायी जीवनाची अनमोल गाथा या विषयावर संवाद साधतील.
प्र.कुलगुरु प्रा. माहुलीकर हे दिव्यांग कला महोत्सवाबद्दल माहिती देऊन खुली चर्चा करणार आहेत. कार्यशाळेस उपस्थित दिव्यांग विद्यार्थ्यांना प्रवास खर्चाची परिपूर्ती म्हणून प्रोत्साहन भत्ता देण्यात येणार आहे. उपस्थितीचे आवाहन विद्यार्थी विकास विभागाचे संचालक डॉ.सत्यजित साळवे यांनी कळविले आहे़