अपंग युनिट शिक्षक समायोजन व थकीत वेतनाच्या प्रतीक्षेत, आदेश न पाळल्याने क्रांतिदिनी उपोषण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 3, 2019 08:35 PM2019-08-03T20:35:43+5:302019-08-03T20:37:19+5:30

अमळनेर : अपंग युनिटवर कार्यरत शिक्षकांना इतर शाळांमध्ये समाविष्ट करण्याचे व थकीत वेतन चार महिन्यात देण्याचे आदेश उच्च न्यायालयाने ...

Disability unit teachers waiting for adjustment and exhausted wages, fasting on revolution day due to disobedience | अपंग युनिट शिक्षक समायोजन व थकीत वेतनाच्या प्रतीक्षेत, आदेश न पाळल्याने क्रांतिदिनी उपोषण

अपंग युनिट शिक्षक समायोजन व थकीत वेतनाच्या प्रतीक्षेत, आदेश न पाळल्याने क्रांतिदिनी उपोषण

Next





अमळनेर : अपंग युनिटवर कार्यरत शिक्षकांना इतर शाळांमध्ये समाविष्ट करण्याचे व थकीत वेतन चार महिन्यात देण्याचे आदेश उच्च न्यायालयाने दिले आहेत. मात्र त्यास एक वर्ष उलटूनही माध्यमिक शिक्षणाधिकारी आर्थिक प्रलोभनांच्या अपेक्षेने आदेशाची अंमलबजावणी करीत नाहीत. त्यामुळे शिक्षकांनी ९ आॅगस्ट रोजी क्रांतिदिनी येथील शिक्षणाधिकारी कार्यालयासमोर उपोषणास बसण्याचा इशारा दिला आहे.
गणेश नागो लिंगायत, दिनेश प्रकाश पाटील, महेंद्र धर्मा पाटील हे तिन्ही शिक्षक शिवाजी हायस्कूल, तांबेपुरा येथे अपंग युनिटवर काम करत होते. ते अतिरिक्त ठरले होते. त्याविरोधात त्यांनी उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात याचिका दाखल केली होती. गणेश लिंगायत, दिनेश पाटील यांच्या याचिकेवर ११ व १८ जुलै रोजी व महेंद्र पाटील यांच्या याचिकेवर २० व १८ जुलै रोजी अतिरिक्त शिक्षकांना इतर शाळांवर समायोजन करण्याचे आदेश दिले होते. तसेच चार थकीत वेतन चार महिन्यात देण्याचेही आदेश दिले होते. मात्र यावर माध्यमिक शिक्षण विभागाने कोणतीही कार्यवाही केली नाही. म्हणून तिन्ही शिक्षकांनी पुन्हा उच्च न्यायालयात अवमान याचिका दाखल केली होती. त्यानुसार नाशिक विभागाच्या शिक्षण उपसंचालकांनी शिक्षकांचे समायोजन व थकीत वेतनाबाबत तातडीने कार्यवाही करण्याचे आदेशित केले होते. याबाबत शिक्षकांनी वेळोवेळी विनंती अर्ज दिले आहेत. मात्र माध्यमिक शिक्षणाधिकारी हे समायोजन व थकीत वेतन मिळण्याकामी जाणीवपूर्वक आपल्या कर्तव्यात दिरंगाई व कसूर करीत आहेत. त्यांना या आदेशाच्या अंमलबजावणीसाठी आर्थिक प्रलोभनाची अपेक्षा आहे, असे वेळोवेळी त्यांच्या कार्यालयातील सूत्रांकडून व त्यांच्या दुफळी बोलण्यातून जाणवत आहे. त्यामुळे तातडीने समायोजन करून थकीत वेतन द्यावे. अन्यथा ९ आॅगस्टला क्रांतिदिनी सकाळी ११ वाजता जिल्हा परिषदेच्या शिक्षणाधिकारी कार्यालयात उपोषणास बसू, असा इशारा गणेश लिंगायत, दिनेश पाटील, महेंद्र पाटील यांनी माध्यमिक शिक्षणाधिकारी व मुख्य कार्यकारी अधिकारीकडे यांना दिला आहे.

Web Title: Disability unit teachers waiting for adjustment and exhausted wages, fasting on revolution day due to disobedience

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.